आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही पुणेरी'नंतर रॅपर श्रेयश घेऊन आला आहे 'फकाट पार्टी', थिरकायला लावणारा आहे VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आम्ही पुणेरी' आणि 'वीर मराठे' या मराठमोळ्या रॅपसाँगच्या घवघवीत यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी मराठी रॅपर, किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव 'फकाट पार्टी' देत आहे. नुकतेच त्याचे हे गाणे लोकांसमोर सादर करण्यात आले असून, त्याच्या आतापर्यंतच्या सर्व रॅपसाँगप्रमाणे हे गाणेदेखील प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे.
 
एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टी साँगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरिओग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात 100 ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले असून त्यात फॉरेनर्सचादेखील समावेश आहे. 
 
'फकाट पार्टी' या नावातूनच या गाण्यातील धम्माल लक्षात येऊ शकते. मुळात 'रॅप' साँग म्हंटले तर डोळ्यासमोर एक वेगळाच नजारा उभा राहतो. हनी सिंग, रफ्तार, बादशाह यांच्या रॅप गाण्यातील एट पाहिली असता, तरुणवर्गाला त्यांची भुरळ पडली नाही तर नवलच! मात्र, श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि 'वीर मराठे' या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्ट फुल 'रॅप' चे एक वेगळे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. परंतु त्याचे 'फकाट पार्टी' हे रॅप साँग त्याहून अगदी वेगळे आणि पॉप गाण्याशी संलग्न असे आहे.
 
श्रेयशच्या सगळ्याच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅपसॉंगला साजेल असा रुबाब पाहायला मिळतो, मराठीतील या आगळ्यावेगळ्या डिस्को रॅप साँगमध्ये अलिशान गाड्या, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पाहायला मिळते.  
 
पाहुयात, श्रेयशच्या 'फकाट पार्टी'ची खास झलक दाखवणारे फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...