आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch Marathi Actress Shruti Marathe's Sizzling Item Number From Baji

VIDEO+PHOTOS: 'बाजी'मध्ये श्रुती मराठेचा सिझलिंग आयटम नंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओवर क्लिक करुन पाहा श्रुतीवर चित्रीत करण्यात आलेले आयटम नंबर)
मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठेचा हॉट अंदाजात प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. आगामी 'बाजी' या सिनेमात श्रुतीवर एक सिझलिंग आयटम नंबर चित्रीत करण्यात आले आहे. अलीकडेच हे गाणे रिलीज करण्यात आला आहे. 'मासोळी...' हे बोल असलेले गाणे बेला शेंडेच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.
या गाण्यात श्रुती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असून तिच्यासाठी खास डिझायनर नऊवारी साडी डिझाइन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रुतीचे हे पहिलेच आयटम नंबर आहे. हे गाणे चित्रीत करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. मुंबईतील मड फोर्टमध्ये रात्रीच्या वेळेत हे गाणे शूट करण्यात आले आहे.
आपल्या पहिल्यावहिल्या आयटम नंबरमध्ये बेस्ट दिसण्यासाठी श्रुतीने चार किलो वजन कमी केले आहे. कोळीगीत असलेल्या या गाण्यात श्रेयस तळपदेचीदेखील एक छोटीशी झलक बघायला मिळते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा आयटम नंबरमधील श्रुतीचा दिलखेचक अंदाज...