‘नच बलिये’च्या आठव्या पर्वातून सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव ही मराठमोळी जोडी बाहेर पडली आहे. गेल्या शनिवारी त्यांचे 'नच बलिये'मधील आव्हान संपुष्टात आले. 'बेबी को बेस पसंद है' या बॉलिवूड गाण्यावर कथकली डान्स फॉर्म सादर करुन सिद्धार्थ-तृप्तीने परीक्षकांची मनं जिंकली.
या भागात अभिनेता सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान 'ट्युबलाईट' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सहभागी झाले होते. याचनिमित्ताने सिद्धार्थ-तृप्तीने परफॉर्मन्ससाठी सलमानच्या सिनेमातील गाण्याची निवड केली होती. 'सुल्तान' या सिनेमातील गाण्यावर कथकली डान्स फॉर्म बघून सलमानने 'सुपर्ब परफॉर्मन्स' असे म्हणत सिद्धार्थ-तृप्तीचे कौतूक केले. विशेष म्हणजे यासाठी परीक्षकांकडून दोघांना 30 पैकी 26 गुणदेखील मिळाले. पण मतं कमी पडल्याने या जोडीला शोबाहेर व्हावे लागले.
OMG... चक्क तीनदा घर सोडून निघून गेली होती तृप्ती, जाणून घ्या मग सिद्धार्थने काय केले!
या परफॉर्मन्ससाठी सिद्धार्थ आणि तृप्तीला बरीच मेहनत करावी लागली. या दोघांना चार तास कपडे परिधान करायला आणि दीड तास मेकअप करायला लागले होते. नच बलियेमधील सिद्धार्थ-तृप्तीच्या या शेवटच्या परफॉर्मन्सची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील तीन स्लाईड्सवर बघा, सिद्धार्थ-तृप्तीचे फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर त्यांच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ....