आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चॉकलेट बॉय' सिद्धार्थ झाला 26 वर्षांचा, अमृता-अनिकेत-पूजासोबत केले Birthday सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरचा आज (14 जून) वाढदिवस असून त्याने वयाची 26 वर्षे पूर्ण केली आहेत. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचा आगामी 'बसस्टॉप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिद्धार्थचा वाढदिवस साजरा केला.

गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाची मराठी रॅपर किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव याने निर्मिती केली असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांची देखील यात महत्वाची भूमिका आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..
 
पुढे बघा, सिद्धार्थच्या बर्थडे सेलिब्रेशनचे 4 फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...