आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fathers\'s Day : बाबा झाल्यावर बदलला सिध्दार्थ जाधव, तर ललित प्रभाकर लावतो वडिलांचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज फादर्स डे आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत आम्ही मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

अभिनेता सिध्दार्थ जाधव
लहानपणी मी जेव्हा जेव्हा हट्ट करायचो, तेव्हा माझे लाड पुरवताना माझे वडील मला नेहमी म्हणायचे, की, तू बाप झाल्यावर तुला कळेल. ह्या वाक्याचा नेमका अर्थ आता बाबा झाल्यानंतर मला कळला. आपल्या मुलीचे लाड पुरवण्याचा अटापिटा काय असतो, तो उमगला. स्वराच्या जन्मानंतर तर तिचं माझं अवघं विश्व झालं होतं. शुटिंग संपवून किंवा नाटक संपवून रात्री दमुन घरी परतल्यावर तिची हाक माझा श्रमपरिहार करत आलीय. ती लहान असताना तिला जवळ घेऊन झोपताना तिची उब आणि मनाला ती सुरक्षित आपल्यासोबत आहे हे वाटणारं समाधान शब्दात नाही सांगता येणार. स्वरा खूप उत्सफुर्त आहे आणि तिच्यासोबत खेळताना मला लहान झाल्यासारखं वाटतं. रात्री झोपण्या अगोदर स्वरासाठी कधी घोडा, कधी वाघ, कधी मगर होण्यातली मजा काही औरच असते.
पुढे जाणून घ्या, अभिनेत्री प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, ललित प्रभाकर, डॉ. गिरीश ओक काय म्हणतायेत फादर्स डेविषयी...