आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थची पत्नी तृप्तीचे अभिनयात कमबॅक, या शॉर्टफिल्ममधून झळकणार प्रेक्षकांसमोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'नच बलिए 8' नंतर सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांच्या फॅनफॉलोइंगमध्ये फारच वाढ झाली. सिद्धार्थ एक उत्तम अभिनेता आहे हे आपल्याला माहितच आहे पण पत्नी तृप्तीही अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहीत आहे. नच बलिए शोमध्ये तृप्तीने तिच्या उत्तम डान्सिंगचा नमुनाही प्रेक्षकांसमोर सादर केला. पण आता तृप्ती पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. 
 
येत्या काही दिवसात तृप्ती आपल्याला प्रितम प्यारे यांच्या 'चाबी' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चार महत्त्वाची पात्र आहेत. विशेष म्हणजे नच बलिए सुरु असतानाच प्रीतम यांनी तृप्तीला शॉर्ट फिल्मसाठी विचारले होते. 
 
"या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये एक अशी व्यक्ती असते की त्या व्यक्तीला आपण आपल्या घरातील एक लक फॅक्टर मानत असतो. पण अशी व्यक्ती आपल्यापासून दुरावली तर त्याचा काय परिणाम होतो, त्याने परिस्थितीत कसा फरक पडतो, असा विषय या शॉर्ट फिल्मचा आहे", अशी माहिती तृप्तीने दिली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सिद्धार्थ-तृप्तीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...