आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: सिद्धार्थ जाधवच्या मुलीच्या B'day सेलिब्रेशनमध्ये महेश मांजरेकरांसोबत पोहोचला 'परशा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सिद्धार्थ जाधवची धाकची मुलगी इरा 6 जून रोजी एक वर्षाची झाली. याच महिन्यात सिद्धूची थोरली मुलगी स्वराचाही वाढदिवस असतो. याचनिमित्ताने सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी 6 जून रोजी आपल्या दोन्ही मुलींचा वाढदिवस एकत्रच साजरा केला. मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित या बर्थडे बॅशमध्ये सिद्धूने मराठी इंडस्ट्रीतील आपल्या मित्रमंडळींना आमंत्रित केले होते.
या सेलिब्रिटी पाहुण्यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते सैराटच्या परशाने... बरोबर या बर्थडे पार्टीत परशा अर्थातच अभिनेता आकाश ठोसरसुद्धा सहभागी झाला होता. अभिनेते-निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर आणि मुलगा सत्यासोबत आकाश या पार्टीत पोहोचला होता.

विशेष म्हणजे महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी सिनेमात आकाशला कास्ट केले आहे. अलीकडेच त्यांच्या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील काही छायाचित्रेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. एका छायाचित्रात शूटिंग सेटवर आकाश महेश मांजरेकरांसोबत दिसत आहे. महेश मांजरेकरांचा हा नवा हीरो आता त्यांच्यासोबत इंडस्ट्रीतील पार्टीजसुद्धा अटेंड करताना दिसतोय. यावेळी आकाश टीशर्ट आणि डेनिममध्ये अगदी कूल दिसला. या सिनेमात आकाशसोबत महेश मांजरेकरांचा मुलगा सत्याचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे समजते.
बर्थडे बॅशमध्ये कोणकोण पोहोचले?
सिद्धार्थ जाधवच्या लाडक्या लेकी स्वरा आणि इराचा वाढदिवस डिस्ने थीमवर साजरा करण्यात आला. सुंदरशी सजावट करण्यात आली होती. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सत्या मांजरेकर, आकाश ठोसर यांच्यासह अभिनेते जयवंत वाडकर पत्नी आणि मुलीसोबत या बर्थडे बॅशमध्ये सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, या बर्थडे बॅशचे खास PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...