आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Siddharth Jadhav's Interview On His Upcoming Film Dreammall

OMG.. सिध्दार्थ जाधवने 15 दिवस रोज मारले अभिनेत्री नेहा जोशीला, का जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सिध्दार्थ जाधवला कॉमेडी भूमिकांमधनं पाहण्याची सवय असलेल्या त्याच्या चाहत्यांसाठी सिध्दार्थ येत्या 26 जूनला एक वेगळं सरप्राइज घेऊन येतोय. सुरज मुलेकर दिग्दर्शित ‘ड्रीममॉल’ चित्रपटामध्ये सिध्दार्थ चक्क एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमाविषयी सांगताना सिध्दार्थ म्हणतो, “गेल्या दोन-तीन वर्षापासून जरा वेगळ्या भूमिका करण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यामुळेच तर मी 'रझाकार', 'प्रियतमा'सारखे चित्रपट केले आणि ‘ड्रीममॉल’ सारखा चित्रपट त्यामुळेच स्विकारला. मी दोन वर्षांपूर्वी 'प्रेमाचा झोलझाल' चित्रपट मढमध्ये चित्रीत करत असताना मला सुरज भेटला, आणि या भूमिकेविषयी त्याने सांगितले आणि मी हा चित्रपट करण्यासाठी खूप उत्सुक झालो.”
'ड्रीममॉल' चित्रपटाची कथा एका रात्रीतली आहे. एका विकृत सुरक्षारक्षकाच्या जाळ्यात सापडलेल्या सई ह्या 22 वर्षाच्या मुलीची त्या रात्रीतली सुटकेसाठीची तडफड या सिनेमात दाखवलेली आहे. मॉलमध्ये सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत सिध्दार्थ जाधव दिसणार आहे. तर त्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा जोशी दिसेल.
चित्रपटातल्या या भूमिकेविषयी सांगताना सिध्दार्थ पूढे म्हणतो, “याचे शुटिंग भांडूपच्या मॉलमध्ये सलग 15 रात्री झाले आहे. तो मॉल रात्री एवढा भयाण वाटतो, की त्या सिक्वेन्सच्या मानसिकतेत आम्ही आपोआप जात असू. सेटवर टाचणी पडेल एवढी शांतता असे, किंबहूना तशी असावी, याची पूर्ण काळजी सुरजने घेतली होती. त्याला सेटवर अजिबात बोललेलं चालायचं नाही. मी आणि नेहा एकमेकांशी एकदाही बोललो नाही. सिनच्या रिहर्सल्ससुध्दा केल्या नाहीत. कारण मॉलमध्ये एकट्या पडलेल्या त्या मुलीला रात्रभर छळणारा सुरक्षारक्षक, त्याची हिडीस मनोवृत्ती हा इम्पॅक्ट सुरजला हुबेहुब आणायचा होता. भूमिकेसाठी मी केस बारीक केले आणि चित्रपटात मेकअप केलेला नाही. माझ्यातला चांगुलपणा पूर्णपणे बंद करून माझ्यातला राक्षस पूर्णपणे जागवायला मला सुरजने सांगितले. नेहाला मी मारल्यावर तिचा गालही सुजला, तिला खूप लागलं, पण एकदाही तिची काळजी घ्यायची नाही, अशा सूचना त्याने केल्या होत्या. नेहाला अक्षरश: मी रोज मारायचो.”
ही सपेन्स थ्रिलर कहाणी असली तरीही, समाजाचं प्रतिबिंब असणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी अंतर्मुख होण्यासारखा हा संवेदनशील चित्रपट असल्याचे सिध्दार्थ सांगतो. तो याबाबत म्हणतो, “स्त्रियांवर सातत्याने होणा-या अत्याचाराबद्दल आपण रोज ऐकतो, वाचतो. त्यांच्यावर होणा-या बलात्काराच्या घटनांनी मन विषण्ण होते. पण ब-याचदा ही मनोवृत्ती आपल्याच ‘बघ्या’च्या भुमिकेने वृध्दिंगत झाल्याचेचं वारंवार समोर आले आहे. आज मलाही एक मुलगी आहे. मुलगी घराबाहेर पडताना मुलीच्या घरच्यांची आणि बापाची होणारी मनस्थिती मी समजू शकतो.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑन लोकेशनची छायाचित्रे...