आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Siddhartha Jadhavs Plans For Valentine Day

सिद्धार्थ जाधव 14ला नव्हे 26 फेब्रुवारीला साजरा करणारेय 'व्हॅलेंटाइन डे', जाणून घ्या कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सिद्धार्थ जाधव)
अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच 'रझाकार' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 27 फेब्रुवारीला त्याचा हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने सिनमाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करतेय. प्रमोशनच्या निमित्ताने सिद्धार्थ महाराष्ट्रभर फिरतोय. आपल्या या बिझी शेड्युलमधून पत्नी तृप्तीला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कसा वेळ देणार असा प्रश्न आम्ही सिद्धार्थला विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थने व्हॅलेंटाइन डेविषयीचे मत आमच्यासोबत शेअर केले.
सिद्धार्थ म्हणाला, ''माझा व्हॅलेंटाइन डेवर विश्वास नाहीये. याचा अर्थ मी या दिवसाचा विरोध करतो असा मुळीच नाहीये. माझ्या मते, प्रेमासाठी एकच दिवस असू नये. मी माझ्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो. हे मला तिला एका ठरावी दिवशीच सांगायला हवे, असे नाही. शूटिंग, प्रमोशनच्या निमित्ताने मी माझ्या घरापासून, कुटुंबीयांपासून बरेच दिवस दूर असतो. मात्र या बिझी शेड्युलमधून मी ज्या दिवशी तृप्तीला भेटतो, तोच माझा तिच्यासाठी व्हॅलेंटाइन डे असतो. आता 'रझाकार'च्या निमित्ताने मी ब-याच शहरांत फिरतोय. 25 फेब्रुवारीपर्यंत मला घरी जायला मिळणार नाहीये. मात्र 26 फेब्रुवारीला माझ्या सिनेमाचा प्रीमिअर आहे. यावेळी तृप्ती हजर असणार आहे. जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी आमची या दिवशी भेट होणार आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारी हा दिवस माझ्यासाठी खास असेल.''