('अमृता' या अल्बममधील 'भेटला पाऊस' या गाण्यातील व्हिडिओमध्ये अमृता नातू)
झी मराठीवरील 'सेलिब्रेटी सारेगमप'च्या सीझन मधून अवघ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या घराघरात पोहोचलेली गुणी गायिका म्हणजे अमृता नातू. मुळची सांगलीची असलेल्या अमृताने शास्त्रीय संगीताचा रियाज सातत्याने करीत अथक परिश्रमांच्या बळावर यश मिळविले आहे. शंकर महादेवन यांच्या सोबत गायलेले 'चिंब भिजलेले, रूप सजलेले'... या रोमॅंटिक गाण्याने तर तरुणाईला वेड लावले. स्वतःचा सोलो अल्बम असावा असे प्रत्येक गायकाचे स्वप्न असते, तेच स्वप्न अमृताने उराशी बाळगले आणि तिचा पहिला वहिला 'अमृता' या अल्बमचे काही वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका पल्लवी जोशी हिच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.
अमृताच्या पहिल्या वहिल्या ''अमृता'' या अल्बममधील 'भेटला पाऊस' या वैभव जोशी लिखित आणि नरेंद्र भिडे यांचे सुमधुर संगीत असलेल्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका म्युझिक कंपनीच्या सागरिका दास यांनी केले असून पहिल्यांदाच गायिका अमृता नातू हिच्यावर गाणे चित्रित करण्यात आले आहे.
मला खरंच खूप आनंद झाला आहे की, माझ्याच अल्बम मधील गाण्याचा व्हिडिओ माझ्यावर चित्रित करण्यात आला आहे आणि जो सागरिका म्युझिक कंपनीतर्फे रिलीज होतोय. अतिशय उत्तमप्रकारे पावसाचे साजेसे असे वर्णन आणि सागरिका दास यांचे अभ्यासू दिग्दर्शन या सर्व गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्याने हे गाणे नक्कीच सर्वाना आवडेल अशी आशा अमृताने व्यक्त केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या व्हिडिओमधील अमृताची निवडक छायाचित्रे...