Home »Bollywood »Marathi Cinekatta» Singer Anand Shinde Birthday Special Story

Bday:शिक्षण सोडून हाती घेतला तबला, यांच्या 'पोपट'ने घातला होता महाराष्ट्रभर धुमाकुळ

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 14:52 PM IST

मुंबई - लग्नाची वरात असो वा जयंती, आनंद शिंदे यांचे एकही गाणे वाजणार नाही असे होऊच शकत नाही. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा पुढे
चालवणारे आनंद शिंदे त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
दमदार गायकी, ठसकेदार आवाजाने आनंद शिंदे यांचा एक वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला. 80 च्या दशकात धुमाकूळ घालणारे गाणे 'जवा नवीन पोपट' हा ऐकले की सर्वप्रथम डोळ्यापुढे चेहरा येतो आनंद शिंदे यांचा. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
आनंद मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. पण त्यांचे लहानपण मुंबईत गेले. कव्वालीचे मुकाबले हे त्यांच्या खास आवडीचे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला आनंद जात असत. कोरसमध्ये गाणी गाणे त्यांच्या अगदी आवडीचे होते.
संगीतप्रेमी घरात झाला आनंद यांचा जन्म
आजोबा उत्तम पेटीवादक आणि आजी सोनाबाई तबलावादक अशा घरात आनंद यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कलेचा वारसा मिळाल्याने आनंद यांनी शाळेत असतानाच गाणे
गायला सुरुवात केली. शाळेत अभ्यासापेक्षा गॅदरींगमध्ये गाणे गायला कधी मिळणार याकडे आनंद यांचे लक्ष असे. नववीत नापास झाल्यानंतर आनंद यांनी हाती तबला घेतला. मार
खात खात ते तबलावादन शिकले. जेव्हा कव्वालीचा मुकाबला असे तेव्हा आनंद आणि मिलिंद हे दोघे भाऊ ढोल वाजवायचे. वडिलांच्या गैरहजरीत तेच कार्यक्रम करत असत.
वाचा पुढच्या स्लाईडवर, आनंद-विजया यांची अशी जुळली लग्नगाठ..

Next Article

Recommended