आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Avadhoot Gupte Sang Marathi Fan Anthem For Shah Rukh Khan

सलमाननंतर किंग खानही मराठीत, अवधूत गुप्तेने गायलं शाहरूखसाठी #FanAnthem

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाहा अवधूत गुप्तेंचा स्वरसाज असलेले गाणे... - Divya Marathi
पाहा अवधूत गुप्तेंचा स्वरसाज असलेले गाणे...
सलमान खानने ‘लय भारी’मध्ये गेस्ट अपिअरन्स दिल्यावर आता शाहरूख खानही मराठी गाण्यावर ठेका धरून नाचताना तुम्हांला दिसेल. पण हे मराठी सिनेमातलं गाणं नाहीये, तर त्याचा आगामी बॉलीवूडपट ‘फॅन’साठी बनवलेलं हे प्रमोशनल मराठी गाणं आहे. शाहरूख खानचं ‘मै तो तेरा जबरा फॅन हो गया’ हे हिंदी गाणं सध्या चांगलचं प्रसिध्द झालंय. त्याचंच हे मराठी व्हर्जन आहे.
यशराज फिल्म्सने बंगाली, पंजाबी, गुजराती, तमिळ, भोजपूरी आणि मराठी ह्या सहा मुख्य भाषांमध्ये ह्या गाण्याचे व्हर्जन काढण्याचा निर्णय घेतला. आणि सहा भाषांमधल्या सुप्रसिध्द गायकांना हे गाणं ऑफर केलं. गुजरातीत अरविंद वेगडा, बंगालीत अनुपम रॉय, भोजपूरीत मनोज तिवारी, पंजाबीत हरभजन मान, तमिळमध्ये नकाश अजीज ह्यांनी तर मराठीत अवधूत गुप्तेला हे मराठी गाणं गायलंय.
ह्या बातमीला दूजोरा देताना अवधूत गुप्तेनी divyamarathi.comशी exclusive बातचित केली. ते म्हणाले, “मैं तेरा जबरा फॅन हो गया, ह्या फॅनएन्थमचे हे मराठी व्हर्जन करायचं जेव्हा यशराजमध्ये ठरलं तेव्हा मराठीत कोण ह्याचा शोध सुरू झाला. यशराज फिल्म्समध्ये काम करणारे रेकॉर्डिस्ट विजय दयाळ हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना गाण्याची उत्तम जाण आहे. ते संगीतकारही आहेत, त्यांनी माझं नाव ह्या गाण्यासाठी सुचवलं. आणि मग मला यशराज फिल्मकडून गाण्यासाठी ऑफर आली.”
शाहरूख खानविषयी बोलताना अवधूत गुप्ते सांगतात, “प्रत्येक गायकाला वाटतं, सर्वात मोठ्या सुपरस्टारसाठी गाणं गावं. किंग खानसाठी गाणं गायला मिळालं, ह्याचा आनंद आहेच. पण त्यासोबतच किंग खानसाठी पहिलं मराठी गाणं मी गायलं, ह्याचा अभिमान खूप आहे. शाहरूख खानला मराठीत आणण्याचा मान एक प्रकारे मला मिळाला ही भावना खूप सुखावणारी आहे. यशराजला जसं मराठीत गाणं करावंस वाटलंय. तशी मराठीत त्यांना माझ्यासोबत एखादी फिल्म कराविशी वाटली, तर मला निश्चितच आवडेल.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाहरूख खानचे फॅन सिनेमातले मराठी गाणे