आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer And Composer Dr. Salil Kulkarni Celebrated 42nd Birthday Today

B\'Day: वैद्यकीयला रामराम ठोकून सलील यांनी केली संगीत क्षेत्राची निवड, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी)
प्रसिद्ध गायक-संगीतकार-लेखक डॉ. सलील कुलकर्णी आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 6 ऑक्टोबर 1972 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या तिस-या वर्षी सलील यांची आकाशवाणी वरून संगीताची सुरवात झाली. त्यांनी संगीताचे शिक्षण गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीताला जास्तीत जास्त वेळ देण्याचे ठरवले. यामुळे अनुराधा मराठे यांच्या सोबत बरेच कार्यक्रम करत होते. दवाखाना व संगीताचे कार्यक्रम या दोन्हीमधे दुवा साधून सलील रियाज व लिखाण करत होते.

दहा वर्षांच्या सांगितिक कारकीर्दीमध्ये सलील यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम) आणि अग्गोबाई ढग्गोबाई - भाग 2 (अल्बम) हे विशेष गाजले आहेत.

आज सलील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी सांगत आहोत...

बालपणीच वडिलांचे छत्र हरवले...
सलील यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आई रेखा कुलकर्णी यांनी बॅकेत नोकरी करून सलील आणि त्यांची बहिण आसावरी या दोन्ही भावंडांना लहानाचे मोठे केले. दोघाही बहिणभावंडाना आईने केलेल्या कष्टाला न्याय द्यायचा होता. त्यामुळे सलील यांनी एमबीबीएस पूर्ण करूनच संगीताच्या क्षेत्रात नाव कमवण्याचा निर्णय घेतला. तर बहिणीने मास्टर करुन लग्न केले.
लव्ह मॅरेजला दिली सलील यांनी पसंती...
सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्या सोबत सलील यांनी 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमांचे अनेक प्रयोग केले. याचवेळी 1996 साली सलील यांची ओळख अंजली यांच्या सोबत झाली. अजंली या अनुराधा यांच्या कन्या आहेत. बरयाच ठिकाणी सलील व अंजली यांनी एकत्र गायन केले. दोघांचाही दुवा संगीत असल्याने दोघांची मैत्री चांगलीच गुफली. दोघांच्याही आवडी, निवडी संगीतात नवे काही तरी करण्याची धडपड यामुळे नकळत दोघांची मने जुळली. सलील लग्नासाठी मुलीच्या शोधत होते. त्यावेळी अंजली व सलील यांनी आपण दोघे एकमेकांना अनुकुल असल्याचे वाटल्यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1 नोव्हेंबर 2000 साली दोघांचे लग्न झाले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून शुभंकर आणि अनन्या ही त्यांची नावे आहेत.
वैद्यकीय क्षेत्राला रामराम...
लग्न झाल्यावर काही दिवसांतच सलील यांनी डॉक्टरची भल्यामोठ्या पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ संगीतात काम करण्याचे ठरवले. नोकरी सोडून आल्यावर सलील यांनी पत्नी अंजलीला मी नोकरी सोडली ऐवढेच सांगितले. त्यावर अंजली या बरं एवढेच म्हणाल्या. कारण त्यांना माहित होते, की सलीलमध्ये काही तरी नवीन करण्याची धडपड आहे आणि एक दिवस सलील नक्की मोठा गायक होईल.
आयुष्यावर बोलू काही
संगीताचे अनेक कार्यक्रम सादर केल्यानंतर 2003मध्ये डॉ. सलील आणि संदीप खरे यांनी 'आयुष्यावर बोलू काही' या सांगितिक कार्यक्रमाची निर्मिती केली. पूर्वी या कार्यक्रमाचे तिकिट अंजली यांनी स्वत:हा सभागृहाबाहेर बसून विक्री केली. त्यावेळी त्यांनाही वाटले नाही या कार्यक्रमाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल तो. पण या संगीताच्या आगळ्या, वेगळ्या प्रयोगाला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. आज या कार्यक्रमाचे 700च्या वर प्रयोग झाले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा डॉ. सलील कुलकर्णी यांची कुटुंबीय आणि मित्रांसोबतची खास छायाचित्रे...