आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ सुगम संगीत गायिका रजनी करकरे यांचे फुप्फुसांच्या विकाराने निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ सुगम संगीत गायिका रजनी करकरे यांचे वयाच्या 74 व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले आहे. रजनीताई यांना फुप्फुसाचा आजार होता. एका खासगी रुग्णालयाच त्यांच्यावर उपचार सुरु होता पण त्यांनी तेथेच अखेरचा श्वास घेतला. 
 
रजनीताई यांना फुप्फुसाचा तसेच फइट्सचाही त्रास होता. आकाशवाणीवरुन जवळपास 30 वर्ष त्यांनी सुगम संगीताचे कार्यक्रम केले. अपंगत्वार मात करुन त्यांनी ही लोकप्रियता मिळवली होती. त्या नसीमा हुजरुक यांच्या हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड संस्थेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होत्या
रजनीताई यांचा ‘आनंदाचे डोही’हा कार्यक्रम लोकप्रिय होता. त्याचे जवळपास हजाराहुन अधिक प्रयोग झाले होते.  कोल्हापूरमधील शर्वरी जाधव, सारेगमप फेम प्रसेनजीत कोसंबी, आणि अभिजीत कोसंबी यांनीही रजनीताईंकडून गाणे शिकले होते.
 
बातम्या आणखी आहेत...