आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: श्रेया घोषालची अनेक वर्षांची अपूर्ण इच्छा कशी झाली \'डबलसीट\'मूळे पूर्ण, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याची आघाडीची गायिका श्रेया घोषालच्या सूरांची मोहिनी आपल्या चित्रपटाच्या संगीतावर असावी, असं आजच्या घडीला प्रत्येक भारतीय फिल्ममेकरला आणि संगीतकाराला वाटतं असतं. त्यामूळे श्रेया घोषालने बॉलीवूड गाण्यांसोबतच प्रत्येक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायलीयत. पण फोकपासून, जॅझपर्यंत, रॉकपासून पॉपपर्यंत, रोमँटिक गीतांपासून सॅडसाँगपर्यंत हरत-हेची गाणी गाणा-या श्रेया घोषालची एक इच्छा मात्र गेले कित्येकवर्ष अपूर्ण होती.
divyamarathi.comशी बोलताना तिने आपल्या इच्छेबद्दल सांगितलं,” मी जेव्हा जेव्हा सिटी टूर करते. कॉन्सर्ट्समध्ये गाते, तेव्हा जिथे जिथे मराठी कानसेन भेटतात, त्यावेळी नेहमी मराठी गाण्यांची फर्माइश होते. खास करून, मी लावणी गायला हवी, असा अनेक मराठी ऑडियन्स आग्रह धरतात. आणि मग मी नेहमीच ‘रेशमाच्या रेघांनी’ गाते. कारण आजपर्यंत माझ्याकडे कधीच माझी लावणी नव्हती. कॉन्सर्टमध्ये गाताना नेहमी वाटायचे, अरे, अद्याप कोणत्याही चित्रपटात, मी लावणी कशी काय गायली नाही.”
चित्रपटासाठी लावणी गाण्याचे श्रेया घोषालचे इतके दिवस अधूरे राहिलेले स्वप्न शेवटी जसराज, सौरभ आणि हृषिकेश ह्या त्रिकुटाने नुकतेच ‘डबलसीट’ चित्रपटातून पूर्ण केले. आणि श्रेयाला एक मुंबईवरची फक्कड ‘मोहिनी’ ही लावणी गाता आली.
Divymarathi.comशी बोलत असतानाच श्रेया ‘डबलसीट’ चित्रपटाच्या संगीत डीव्हीडीच्या प्रतिकृतीवर Autograph देत होती. संगीत अनावरण सोहळ्याला श्रेया येऊ शकली नव्हती. त्यामुळे गीतकार क्षितीज पटवर्धन आणि संगीतकार जसराज, हृषिकेश, सौरभ ह्यांनी तिची खास भेट घेऊन फिल्मच्या डीव्हीडी प्रतिकृतीवर तिचा ऑटोग्राफ घेतला. त्यावेळी साक्षीला होतं, अर्थातच divyamarathi.com.
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, श्रेयावर कशी चढली मराठी लावणीची मोहिनी