आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Most Talented Singer Sonu Nigam Sung 2 Marathi Songs First Time For One Film

सोनू निगमने मराठीत पहिल्यांदाच एका सिनेमासाठी गायली दोन गाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संगीतकार अभिजित नार्वेकर आणि गायक सोनू निगम)
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगमचे नावही या यादीत सामिल झाले आहे. "हिरवा निसर्ग…" या लोकप्रिय गाण्यापासून ते अगदी हल्लीच्या "टिक टिक वाजते… " या त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. 'स्विस एन्टरटेण्मेंट'ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या आगामी अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित 'चीटर' या सिनेमात गायक सोनू निगमने पहिल्यांदाच एकाच सिनेमात दोन मराठी गाणी गायली आहेत.
मुंबई येथील एका स्टुडिओमध्ये सोनू निगमच्या आवाजात दोन गाणी रेकॉर्ड करून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. गेली ७-८ वर्ष सोनू निगम यांच्या शोजमध्ये विविध प्रकारची ताल वाद्य वाजविणाऱ्या अभिजित नार्वेकर ह्या तरुणाने या सिनेमासाठी संगीत दिले असून त्याचा हा संगीतकार म्हणून पहिलाच सिनेमा आहे.
दोन्ही गाणी ड्यूएट असून गायिका आनंदी जोशीने सोनूसोबत ही गाणी गायली आहेत. अखिल जोशी यांनी या सिनेमातील चारही गाणी लिहिली असून ही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. मला या सिनेमासाठी संगीतकार म्हणून पहिली संधी दिल्याबद्दल मी अजय फणसेकर यांचा आभारी असल्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले.
'चीटर' या सिनेमाच्या एकंदरीत नावावरूनच आपल्याला सिनेमाचा विषय लक्षात येतोच पण त्याचसोबत या सिनेमातील अजून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून लक्ष्मण बुवा हे या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहणार आहेत. अभिनेते हृषिकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटींग मॉरिशियस येथे सुरु झाले असून उर्वरित काही चित्रीकरण वाई येथे पार पडणार आहे.