आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Secrets Of Marathi Actress Gauri Nalawade

'फ्रेंड्स' टर्निंग पॉईंट तर स्वप्नील जोशी आहे फेव्हरेट सहकलाकार, वाचा गौरीचे Slam Book

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 15 जानेवारी बॉक्स ऑफिसवर 'फ्रेंड्स' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सचित पाटील मेन लीडमध्ये आहेत. या सिनेमातून एक नवा चेहरा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावणारेय आणि हा चेहरा आहे गौरी नलावडे. साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रामण्णा माधेश यांच्या पहिल्या मराठी सिनेमातून गौरी 70 एमएमवर झळकणारेय.
तसे पाहता टीव्ही इंडस्ट्रीसाठी गौरी नलावडे हे परिचयाचे नाव. झी मराठी वाहिनीवरील ‘अवघाची संसार’ या मालिकेतून करिअरला सुरुवात करणा-या गौरीला 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेतून खरी ओळख प्राप्त झाली. मात्र ही मालिका संपल्यानंतर गौरी दीड ते दोन वर्षे कुठेच दिसली नाही. आता मोठ्या पडद्यावरुन गौरी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. पहिल्याच सिनेमात तिला स्वप्नील आणि सचितसोबत काम करायला मिळाल्याने ती खूप आनंदी आहे.
सिनेमांची प्रचंड आवड असणारी गौरी कुठल्याही एक्टिंग स्कूल मध्ये न जाता, तिथे न शिकता चित्रपट बघत-बघत अभिनय शिकत गेली. ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर अनेक ऑडिशन्स, स्क्रीन टेस्ट देत तिला पहिला ब्रेक मिळाला. मिळालेल्या संधीचे सोने करत तिने अभिनय क्षेत्रात स्वतःची कारकीर्द घडवायला सुरुवात केली आणि आता 'फ्रेंड्स'च्या माध्यमातून तिला करिअरमधील एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
'फ्रेंड्स'च्या निमित्ताने नुकतीच गौरीशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. यावेळी आम्ही तिच्याकडून तिचे काही सिक्रेट्स जाणून घेतले. तिच्याविषयीच्या या खास गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा गौरीचे स्लॅम बुक...