आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Murder-Mystery: भन्साली निर्मित स्वप्निल जोशी स्टारर ‘लाल इश्क’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय लीला भन्सालींच्या मराठी सिनेमाची घोषणा होऊन सहा महिने उलटले तरीही सिनेमाचं नाव निश्चित झालं नव्हतं. पण आता भन्सालींनी शेवटी ह्या सिनेमाला नाव दिलं आहे. सिनेमाचं नाव हे ‘लाल इश्क’. २७ मे ला हा सिनेमा रिलीज होतोय. स्वप्निल जोशी, अंजना सुखानी, स्नेहा चव्हाण, समीधा गुरू, प्रिया बेर्डे अशी स्टारकास्ट सिनेमात आहे.
सिनेमाची दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सिनेमाच्या नावाविषयी सांगते, “भन्सालीसरांनी जेव्हा सिनेमाचा पहिला कट पाहिला, तेव्हापासूनच हे नाव त्यांच्या डोक्यात घोळत होतं. हे नाव ठरवायच्या अगोदर अजून दोन-तीन नावांचीही चर्चा सुरू होती. पण शेवटी भन्सालीसरांना हेच नाव आवडलं होतं. त्यामूळे ‘लाल इश्क’वर शिक्कामोर्तब झालं. ही खरं तर माझ्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या धाटणीची फिल्म आहे. ही मर्डर-मिस्ट्री आहे. गेल्या पंचवीस वर्षात मी थरार असलेल्या टीव्ही मालिका दिग्दर्शित केल्या. रोमँटिक सिनेमा दिग्दर्शित केला. पण मर्डर-मिस्ट्रीपर्यंत कधीच पोहोचले नव्हते. पहिल्यांदा असं काही ट्राय करतेय. मीच काय, स्वप्निल जोशी किंवा संजय लीला भन्सालींनी ह्या पठडीची फिल्म कधी केली नव्हती. त्यामुळे आम्हां सर्वांसाठीच हा एक नवा अनुभव असेल.“
भन्सालींना एकुणच रंगांविषयी खूप आत्मियता असल्याचं आजपर्यंतच्या त्यांच्या सिनेमातून दिसून आलीय. स्वप्ना ह्याविषयी सांगते, “हो ना, ‘सावरिया’मधल्या निळा छटा, ‘रामलीला’मध्ये लाल छटा, ‘गुजारिश’मध्ये काळा, हिरवा, नीळा रंग, ‘ब्लॅक’मध्ये काळी छटा अशापध्दतीने त्यांचं असलेलं रंगाशी नातं आपल्यासमोर आलेले आहेत. आता ह्या सिनेमातही आम्ही त्यांच्या स्टाइलने थोडे फार रंगाशी खेळलोय, असं म्हणायला हरकत नाही.”
सिनेमाच्या नावातच इश्क आहे. त्यामुळे अर्थातच प्रेमाच्या अवतीभवती कथानक फिरतंय हे दिसूनच येतंय. ह्याविषयी सिनेमाचा हिरो स्वप्निल जोशी सांगतो, “हो ह्या थ्रिलर सिनेमाच्या कथेच्या गाभ्यात प्रेम हा मूळ घटक आहे. सिनेमाचं नाव जसं लाल इश्क आहे तसंच त्याची टॅग लाइन गुपित आहे साक्षीला ही आहे. आयुष्यात ब-याचदा प्रेम असतं म्हणूनच इर्शा, घृणा अशा भावनाही असतात. प्रत्येक प्रेमाच्या मागे खूप गोष्टी दडलेल्या असतात. प्रत्येक प्रेमात संघर्ष, कटूता अशा अनेक गोष्टींच्या छटा असतात तेच ह्या सिनेमातही आहे. जसं आपण ‘चंद्र आहे साक्षीला’ असं म्हणतो. तसंच ह्या सिनेमाच्या बाबतीत गुपितं आहेत साक्षीला ही गोष्ट लागू पडते. जसं स्वप्ना म्हणाली, मितवा ह्या रोमँटिक सिनेमाच्या अगदी विरूध्द ही फिल्म आहे. सिनेमाशी निगडीत मुख्य कलाकरांपैकी कोणीच आजपर्यंत अशा पठडीचा सिनेमा केलेला नाही. त्यामुळे आम्हांला थोड्या वेगळ्या स्टाइलच्या सिनेमात पाहता येणार आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लाल इश्क सिनेमाच्या सेटवरचे फोटो
बातम्या आणखी आहेत...