आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करविजेत्या चित्रपटात झळकली होती ही मराठमोळी अॅक्ट्रेस, जगतेय इतकी ग्लॅमरस Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 10 नॉमिनेशन आणि 8 अॅकॅडमी अवॉर्डविजेता स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटात झळकलेली लतिका म्हणजेच तन्वी लोणकर आता 22 वर्षाची झाली आहे. मुळची मुंबईची असलेली तन्वी सध्या जॉर्जिया येथे राहते. आठ वर्षापूर्वी आलेला चित्रपट स्लमडॉग मिलेनिअरमध्ये तन्वीने लहान फ्रिडा पिंटोची भूमिका केली होती. तन्वीची भूमिका फार मोठी नव्हती पण तिचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. वडील बँकेमध्ये आहेत कामाला...
 
 वडील बँकेमध्ये आहेत कामाला...
 तन्वीचा जन्म मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव गणेश लोणकर असून ते यूनियन बँकेत कामाला आहेत तर आई हिंदूजा हॉस्पीटलमध्ये टेक्निशीअन आहे. तन्वीला एक लहान बहीण आहे तिचे नाव जान्हवी आहे. तन्वी सध्या  जॉर्जिया कॉलेज ऑफ स्टेट युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. 
 
 अशी झाली टीनएज लतिकासाठी निवड...
 तन्वीला तिच्या काकांनी स्लमडॉग मिलेनिअरमध्ये रोल करण्यासाठी तिच्या काकांनी सुचवले होते जे स्लमडॉग.. चे सह-दिग्दर्शकाच्या ओळखीचे होते. यानंतर तन्वी ऑडिशनला गेली पण तिने ज्यासाठी ऑडिशन दिली तो सीनच रिजेक्ट झाला. त्यानंतर तिच्या डान्समधील कौशल्य पाहून तिच्या काकांनी तिला छोट्या लतिकाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले आणि तिला तो रोल मिळाला. 
 
 स्लमडॉग मिलेनिअरनंतर केले कन्नड चित्रपटात काम..
 स्लमडॉग मिलेनिअरनंतर तन्वीने Kadhal Theevu या चित्रपटात 2012 रोजी काम केले. लो बजेट असलेला हा चित्रपट रिलीजच झाला नाही. त्यानंतर तिने 2013 साली Vidayutham या चित्रपटात काम केले. हा चित्रपट 18 मार्च 2016 रोजी रिलीज झाला. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, तन्वी लोणकरचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...