Home | Bollywood | Marathi Cinekatta | Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident

..जेव्हा रात्री २ वाजता स्मिता पाटीलने केला होता अमिताभ यांना फोन, दिली होती 'ती' भयावह बातमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 09:32 AM IST

26 जुलै 1982 हा तोच दिवस होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला

 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीय वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. संपूर्ण अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी हा फारच मोठा दिवस आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस सर्वांनीच धुमधडाक्यात साजरा केला. पण या महानायकाच्या जीवनात असा एक दिवस आला होता ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीच नव्हे पूर्ण देश हादरला होता. 26 जुलै 1982 हा तोच दिवस होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याला मोठा हादरा बसला, 'कुली' शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटींग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सच्या एका ठोश्यामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी तर अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.

  3 ऑगस्ट रोजी अमिताभ मृत्यूच्या दाढेतून परत घरी आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील..

  पुढच्या स्लाईडवर वाचा, फोन करुन अमिताभ यांना काय म्हटल्या स्मिता पाटील..
 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident

  रात्री २ वाजता केला होता स्मिता यांनी फोन..
   
  अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरुमध्ये सुरु होते. त्यादरम्यान एकदा रात्री २ वाजता मला रिसेप्शनमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री स्मिता पाटील यांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी चरकलो कारण मी कधीही स्मिताशी इतक्या रात्री बोललो नव्हतो. मी फोन घेतल्यावर मला समोरुन स्मिता यांनी विचारले, तुमची तब्येत ठिक आहे ना? यावर मी हो असे उत्तर दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्यासोबत अपघात घडला. 

 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident

  अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी 'नमक हलाल', 'शक्ती' आणि 'गुलामी' या सिनेमात काम केले आहे. 

   पुढच्या स्लाईडवर पाहा, या coolie चित्रपटादरम्यानचे काही खास PHOTOS..

 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  'कुली'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर
 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  अपघातातून बचावल्यानंतर घरी आलेले अमिताभ बच्चन
 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  'कुली' चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन
 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  लहानग्या अभिषेकसोबत खेळताना अमिताभ बच्चन
 • Smita Patil Had A Bad Dream About Amitab Bachchan Coolie Accident
  'कुली' च्या सेटवर अमिताभ यांना भेटायला आलेले अमजद खान

Trending