आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 8 महिनेच टिकले या अभिनेत्रीचे दुसरे लग्न, पतीच्या रोजच्या मारहाणीमुळे झाली होती परेशान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळतात असे म्हणतात. पण काहीवेळा या जुळलेल्या गाठी शेवटपर्यंत टीकण्यासाठी नसतात. असेच काहीसे झाले आहे वीरा फेम अभिनेत्री स्नेहा वाघसोबत. स्नेहाने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत पण हे दोन्ही लग्न टिकले नाही. आता तिच्या या तुटलेल्या लग्नांबद्दल बोलण्यासाठी स्नेहा पहिल्यांदाच समोर आली आहे. स्नेहाने तिच्या या तुटलेल्या लग्नाबद्दल केले काही खुलासे..
 
स्नेहाने दुसरे लग्न अनुराग सोलंकी या इंटेरीअर डिझायनरसोबत केले होते. हे लग्न केवळ 8 महिने टिकले. गेल्या वर्षभरापासून हे दोघे वेगळे राहत आहेत. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. स्नेहाने घरगुती हिंसाचारामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. याबाबत विचारले असता स्नेहाने या बातमीस दुजोरा दिला आहे. स्नेहाने तिच्या पहिल्या लग्नाबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या...
 
पहिले लग्न झाले तेव्हा केवळ 19 वर्षाची होती स्नेहा..
स्नेहा सांगते, माझे पहिले लग्न झाले तेव्हा मी 19 वर्षाची होते. मला त्यावेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. मला त्यावेळी नेमके काय करावे ते समजत नव्हते. असे सहन करता करता सात वर्षे निघून गेली आणि मी अखेर त्या लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि माझे नशीब पाहा, दुसऱ्यांदाही मी चुकीच्या व्यक्तीची निवड केली. 
 
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी म्हटली स्नेहा..
स्नेहाने सांगितले की मी दोन्ही वेळेस भित्री होती. माझ्यावर होणाऱ्या या अत्याचाराला मी कसे सांभाळू आणि याबद्दल कसे सांगू यावरुनच माझ्या मनात सांशकता होती. पण यावेळी माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या जवळच्या लोकांनी मला सपोर्ट केला. मी आता अखेरयाबद्दल उघडपणे बोलते आहे याचा मला आनंद होतो. लोक काय म्हणतील याचा आपण जास्त विचार करतो आणि त्यामुळे आपल्यासोबत नेमके काय घडतेय हे सांगण्यास टाळतो. पण मी पुन्हा माझ्या आईवडिलांची आणि जवळच्या लोकांची ऋणी आहे की त्यांनी मला यातून बाहेर पडण्यास मदत केली. 
 
पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी स्त्रिया आवडत नाही..
स्नेहाने सांगितले की, मला असे जाणवले की मी या व्यक्तीसोबत माझे संपूर्ण आयुष्य काढू शकत नाही. मी नेहमीच माझ्या विचारांवर आणि कृतींवर ठाम राहिलेली आहे. पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त सक्षम आणि यशस्वी स्त्रिया आवडत नाही. आता मी लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा विचार करणार आहे. लग्न आणि प्रेम हे दोन्ही विषय माझ्यासाठी आता पूर्णपणे संपले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्नेहा वाघचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...