आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्सल सोलापुरी \'पोरी तुझा नखरा\' 13 अॉगस्ट रोजी चॅनलवर, टी सिरीजने विकत घेतले हक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरची वाटचाल जशी स्मार्ट सिटीकडे चालू आहे, तशी येथील कलावंतांची वाटचालही स्मार्ट सादरीकरणाकडे चालू आहे. सोलापूरच्या सरस्वतीचंद्र ग्रुप यांनी तयार केलेले सुधीर टोणपे यांची निर्मिती असलेल्या पोरी तुझा नखरा हे पाच मिनिटांच्या रॅप साँगचे हक्क प्रख्यात टी सिरीजने विकत घेतलेले अाहेत.
 
याची फोटोग्राफी संकलन पवन बारगजे यांचे असून दिग्दर्शन सोलापूरचेच संदीप जाधव यांचे आहे. पोरी तुझा नखरा या रॅपसाँगमध्ये मनोज टोणपे मुंबईची अपूर्वा घाेले, भाग्यश्री देशमुख यांच्यासह काही सहकलावंतांचा समावेश आहे. याचे चित्रण सोलापुरातील इप्पाकायल सभागृह, अमोल चाफळकर यांचे कलासाधना केंद्र काटगाव या परिसरात झाले आहे. नाइन एक्स झकास, मायबोली, संगीत मराठी या चॅनल्सवर हे रॅपसाँग १३ ऑगस्ट रोजी झळकणार आहे. 
 
श्रेयनामावली 
निर्मिती-सुधीर टोणपे, सरस्वतीचंद्र ग्रुप, सोलापूर रॅपसाँगचे नाव- पोरी तुझा नखरा, दिग्दर्शक- संदीप जाधव, गायक-नकाश अझीझ, कॅमेरा संकलन- पवन बारगजे, कलावंत- मनोज टाेणपे, सनी खेरवाल, अपूर्वा घोले, भाग्यश्री देशमुख, संगीत- मनोज टोणपे, नृत्य दिग्दर्शन पोषाख - गंगम राजू, श्रद्धा हुल्लेनवरू, श्रद्धा बायस, कला दिग्दर्शन- राहुल माने आणि संदीप जाधव, गीत- मनोज टोणपे सनी खेरवाल, मेकअप- श्रीनिवास कोंडूर, श्रृती गोफणे, स्थिर चित्रण-लखन गहेरवार, निर्मिती व्यवस्थापन- विशाल चव्हाण, देविदास मेटकरी, बी. कोनेक.

पुढील स्‍लाइडवर...पहिल्‍या रॅपसाँगबद्दल दिग्‍दर्शकाचे काय आहे म्हणणे? 

 
 
बातम्या आणखी आहेत...