आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: शशांक, स्पृहा, प्रिया, उमेश, अमृताने केली weekendला पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शशांक केतकर, स्पृहा जोशी, अमृता सुभाष, प्रिया बापट, उमेश कामत ह्या सिने-मालिका-नाट्य क्षेत्रातल्या तारेतारकांना एकत्र पार्टी करताना पाहण्याची संधी ह्या विकेन्डला मिळाली. औचित्य होतं, सोनल प्रॉडक्शन ह्या नाट्यसंस्थेच्या Thanx Giving पार्टीचं.
‘अखियों के झरोकों से’ ह्या ऑक्रेस्ट्राने सुरू झालेल्या सोनल प्रॉडक्शनने त्यापाठोपाठ ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘परफेक्ट मिसमँच’ आणि ‘डोन्ट वरी बी हॅपी’ ह्या नाटकांची निर्मिती केली. ह्या सर्व नाटकांना गेल्या एका वर्षात मिळालेल्या सक्सेसमूळे सोनल प्रॉडक्शनने पार्टीचं आयोजन केलं होतं.
फिल्मची सक्सेस पार्टी ही गोष्ट नवीन नाही. पण नाटकाची सक्से पार्टी असणं, हे कलाकारांसाठीही नाविन्यपूर्ण गोष्ट होती. शशांक केतकर ह्याविषयी सांगतो, “ह्या निर्मिती संस्थेच्या नाटकाच्या विषयात नाविन्य असतं. तसंच यशाबद्दल thanx giving करणं, त्यासाठी एक पार्टी ठेवणं ही गोष्टच मराठी नाट्यसृष्टीत नवीन आहे. पण हे सोनल प्रॉडक्शनचं वैशिष्ठ्य आहे, असं मला वाटतं. ह्याअगोदर नाटकाचे दौरे म्हटले की, खराब हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था किंवा ढेकूण असलेल्या गाद्या, आणि अस्वच्छ बसेस ही नाटकाच्या दौ-यातली वैशिष्ठ्य आपण ऐकलीयत. पण आम्हांला मात्र दो-यावेळी फोर किंवा फाइव्ह स्टारच्या हॉटेलमध्ये राहायला मिळतं. त्यामुळे मला ही नाट्यसंस्था आवडते. आणि कदाचित हेच त्यांच्या यशाचं गमक असल्याचं मला वाटतं.”
अभिनेत्री लीना भागवत ह्या संस्थेशी गेले तीन वर्ष जोडलेली आहे. ती सांगते, “एरवी सक्सेस पार्टी म्हटलं, की फिल्म किंवा मालिकेतले मुख्य कलाकार आपल्याला नेहमी दिसतात. पण ह्या पार्टीचं वैशिष्ठ्य आहे, ते म्हणजे आम्हा स्टेजवरच्या कलाकारांपेक्षा रंगमंचामागे काम करणा-या कलाकारांचा सत्कार आणि त्यांना एकप्रकारे पार्टीने धन्यवाद दिलं जातंय, हे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, Thanx Giving पार्टीचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...