आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी मराठी बोलायलाही सोनालीला व्हायचा त्रास, आज आहे मराठीच्या टॉप अॅक्ट्रेसेसपैकी एक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटांतील अप्सरा सोनाली कुलकर्णीने  इंडस्ट्रीत दहा वर्षे पूर्ण केली आहेत. सोनालीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून 10 वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. सोनालीने हे सेलिब्रेशन करण्यासाठी फेसबुकवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.  विशेष म्हणजे सोनालीची आई पंजाबी असल्याने लहानपणा -पासून घरात  ती हिंदीतच बोलत असे. त्यामुुळे मराठी चित्रपटात तिला पहिले या गोष्टीचा त्रास झाला. पण यावरही मात करत तिने मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले. सोनालीच्या दशकपुर्तीनिमित्त आज तिच्याबद्दल काही   खास गोष्टी आपल्याला सांगणार आहोत.  मुळची पु्ण्याची आहे सोनाली कुलकर्णी...

18 मे 1988 रोजी जन्मलेली सोनाली मुळची पुण्याची आहे. गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, होय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी. मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, वडील मराठी तर आई आहे पंजाबी..
बातम्या आणखी आहेत...