आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला भेटली 'अप्सरा', म्हणाली - 'काही फोटोजना कॅप्शनची गरज नसते'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानला भेटण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मग तो सर्वसामान्य असो वा एखादी सेलिब्रिटी... जर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले तर मग सोनेपे सुहागाच. मराठी इंडस्ट्रीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. सोनालीची अलीकडेच शाहरुख खानसोबत भेट झाली. शाहरुखच्या मुंबईतील रेड चिलीच्या ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली.
 
आता सोनाली शाहरुखला भेटली म्हणजे ती त्याच्या एखाद्या सिनेमात काम करणार की काय... असे तर्कवितर्क लावले जातील. पण सध्या तरी तसे काहीही नाही. झाले असे, की सोनालीने काही मराठी कलाकारांसोबत ट्विटरच्या ऑफिसला भेट दिली. ज्या बिल्डिंगमध्ये ट्विटरचे ऑफिस आहे, तिथेच शाहरुख खानचेही ऑफिस आहे. योगायोगाने सोनाली आणि शाहरुखची भेट घडून आली.
 
शाहरुख भेटीमुळे सोनाली भलतीच खुशीत आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर शाहरुखसोबतचा फोटो पोस्ट करुन ''काही छायाचित्रांना कॅप्शनची गरज नसते... बस नाम की काफी है...'', असे लिहिले आहे. सोबतच 'माय क्रश', 'जबरा फॅन', 'व्हेन सोनाली मेट एसआरके', 'फॅन मोमेंट' हे हॅशटॅगसुद्धा तिने दिले आहेत. एकुणच काय तर शाहरुखला भेटल्याने 'अप्सरे'ची स्वप्नपुर्ती झाली, हेच खरे...    

पुढील स्लाईडवर बघा, सोनालीने शेअर केलेला शाहरुखसोबतचा फोटो... 
 
बातम्या आणखी आहेत...