आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : सोनाली कुलकर्णीने वाटले घरोघरी न्यूजपेपर? का आणि कधी जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाली कुलकर्णीने केले वर्तमान वाटप
प्रत्येकालाच आयुष्यात मोठं होण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. सुपरस्टार होण्याअगोदर रजनीकांतने बसकंडक्टर म्हणून काम केले आहे. तर अक्षयकुमारने रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवले आहे. प्रत्येक स्टारच्या काही ना काही स्ट्रगल-स्टोरीज असतात. हे सगळे झाले अभिनेत्यांच्याबाबत. पण आपल्या नाजुक-साजुक अभिनेत्रींना असे स्ट्रगल करावे लागेल तर. मग तर उत्सुकता चाळवतेच ना...
सध्याची मराठीतली आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही कधीकाळी लोकांच्या घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटले आहेत. फक्त फरक एवढाच आहे, की तो काळ सोनालीच्या स्ट्रगलचा काळ नव्हता. तर सोनाली तोपर्यंत अभिनेत्री म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्थिरावली होती. मग का आली सोनालीवर वेळ लोकांच्या घरी जाऊन पेपर वाटायची?
सोनालीला याबद्दल विचारल्यावर हसून म्हणते,”मी वृत्तपत्र वाटली, म्हणजे काही वाईट परस्थिती आली, असंच वाटतं असेल ना.. पण तसं काही नाही आहे. मला पूर्वीपासून बातमी याविषयी फार उत्सुकता आहे. लहानपणापासून माझ्यावर झालेल्या वाचनाच्या संस्कारांमध्ये सकाळी उठून पेपर वाचन करणे, हा महत्वाचा संस्कारही माझ्यावर झाला आहे. अगदी आजही मी कितीही व्यस्त असले, तरीही सकाळी उठल्यावर मला एका हातात गरम पाणी आणि दुस-या हातात वर्तमानपत्र हे हवेच. आणि तुम्हांला विश्वास बसणार नाही पण मी याच उत्सुकतेपोटी आणि आत्मियतेपोटी मास कम्युनिकेशनचा कोर्सही पाचवर्षांपूर्वी केला आहे. आणि योगायोग म्हणजे मास कम्युनिकेशनची सगळी माहिती करून घेतल्यावर माझा हा अभ्यास मी पूर्ण केल्यावर मी घरोघरी जाऊन पेपर वाटलेत.“
सोनाली वृत्तपत्र वाटपाच्या चार वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवताना म्हणते, “आजपासून बरोबर चार वर्षांपूर्वी ३ जुलै २०११ ला मी वृत्तपत्र वाटले होते. आणि ते ही कुठे माहिती आहे?.. नाशिक शहरात. मी त्या आठवणी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यासाठी तर तो लाइफटाइम एक्सपिरीयन्स होता. मी चक्क घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांचे वाटप केले होते. आणि मला असे सकाळी सकाळी दारात हातात वर्तमानपत्र घेऊन पाहिल्यावर लोकं चाट पडली होती. माझ्या सरप्राइज व्हिजीटमूळे लोकांच्या चेहच्यावर जे हसू फुललं. त्यांच्या चेह-यावर मला पाहून जो आनंद झाला. त्यामूळे कलाकार म्हणून खूप छान वाटलं. आणि ते समाधान मला आज शब्दात नाही सांगता येणार. आणि सरप्राइज कोणाला नाही आवडतं, सांग ना?”
( फोटो - अजित रेडेकर)
पूढील स्लाइडवर वाचा, सोनाली कुलकर्णीचा वृत्तपत्र वाटपाबाबातचा खुलासा