आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीला त्रास रिक्षावाल्याचा... जाणून घ्या कोण आहे हा रिक्षावाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर बसले अमेय वाघच्या रिक्षामध्ये
तुम्हां-आम्हां सामान्य माणसाला रिक्षावाल्यांचा त्रास होतो, ही तर नेहमीचीच रड आहे. पण एखाद्या अभिनेत्रीला जर रिक्षावाल्याचा त्रास होऊ लागला, तर आश्चर्य वाटणे सहाजिकच आहे ना.. पण आता तुम्ही विचार कराल, की अभिनेत्रींच्या दिमतीला त्यांच्या आलिशान गाड्या असताना, त्यांना रिक्षाची काय गरज?... आणि ती ही सोनाली कुलकर्णीसारखी अभिनेत्री?..
सोनाली कुलकर्णीला तिच्या दैनंदिन आयुष्यात रिक्षावाल्याच्या मुजोरीचा फटका बसत नाही. पण तिने नुकत्याच केलेल्या ‘शटर’ चित्रपटात तिला चांगलाच फटका बसला आहे. ‘शटर’ चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर एका दुकानाच्या शटरमध्ये अडकलेले असताना त्यांना घ्यायला येणार असतो, एक रिक्षावाला. आणि हा रिक्षावाला बनलाय, अभिनेता अमेय वाघ. रिक्षावाला बनलेला अमेय, त्या एका रात्री सोनाली आणि सचिनला एका दुकानात बंदिस्त सोड़ून दारू प्यायला जातो. आणि दारू पिऊन रिक्षा चालवल्याने त्याला पोलिस पकडतात. आणि म्हणून मग रात्रभर सोनाली आणि सचिनला एका दुकानाच्या शटरमध्ये अडकून राहावं लागतं. असं चित्रपटाचे कथानक आहे.
सोनाली आणि सचिनवर आलेली ही वेळ कोणावरही येऊ नये, असा संदेश देण्यासाठी आणि चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नुकतीच सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि अमेय वाघ यांनी रिक्षा चालवतं,मुंबईच्या काही रिक्षावाल्यांना भेट दिली. जसं अमेयने दारू प्यायली तशी तुम्ही पिऊ नका, ‘Don’t Drink and Drive’ असा संदेश देतानाच या तिघांनी रिक्षावाल्यांसोबत मस्त गप्पा मारल्या आणि फोटोही काढले.
ब-याचदा लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना, रिक्षावाल्यांना रोज आपल्या समोरच्या रूक्ष रस्त्यांना आणि कधीही न संपणा-या अन् वैताग देणा-या ट्रफिकलाच पाहावं लागतं. पण आपल्या नेहमीच्या जीवनशैलीतून जरा मोकळा वेळ मिळून, चक्क मराठी स्टार्सनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सेल्फी काढल्याबद्दल रिक्षावाले सुध्दा खुश झाले.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, मुंबईच्या रिक्षावाल्यांसोबत काढले, सोनाली, सचिन, अमेयने 'सेल्फी'