आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, Women's day विषयी मराठी अॅक्ट्रेसेस काय म्हणतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच सर्वत्र जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. अभिनेत्री नेहा महाजन म्हणते, ''महिला दिन हा फक्त स्त्रियांसाठीच महत्वाचा असतो असे मी मानत नाही. तर पुरुषांसाठीसुध्दा हा दिवस विशेष ठरू शकतो. स्त्री असो वा पुरुष असो, या दोन्ही नैसर्गिक रचना असून, केवळ शारीरिक बदल वगळता या दोन्हीही व्यक्ती शेवटी माणूसच असतात. त्यामुळे या दिवसापासून तरी सगळे भेदभाव बाजूला सारून आधी आपण एक माणूस आहोत याची जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वत:ला करून द्यायला हवी. महिला म्हणजे अबला नारी किवा पुरुष म्हणजे एक सशक्त व्यक्तिमत्व असे सगळे भेदभाव कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. कारण जेव्हा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल तेव्हाच काहीतरी सकारात्मक गोष्ट हाताशी येऊ शकेल. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला सगळ्यांना हीच एक आठवण करून द्यायची आहे की, स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून एकमेकांचा आदर करा.''
 
पुढे वाचा, मुक्ता बर्वे म्हणते, एक माणूस म्हणून तिला देखील स्वच्छंदी जगू द्या...
बातम्या आणखी आहेत...