आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अगं बाई अरेच्चा 2\'च्या स्क्रिनिंगला अवतरले लखलखते तारांगण, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('अगं बाई अरेच्चा 2' या मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला जमलेली कलाकारांची मांदियाळी)
'अगं बाई अरेच्चा 2' या मराठी सिनेमाची सर्वत्र सध्या बरीच चर्चा रंगत आहे. 22 मे रोजी रिलीज होणा-या या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी (20 मे) मुंबई येथे आयोजित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी स्टारर हा सिनेमा 2004मध्ये रिलीज झालेल्या 'अंगबाई अरेच्चा'चा सिक्वेल आहे.
या स्क्रिनिंगला अलका कुबल-आठल्ये, शालिनी ठाकरे, लिना भागवत, संदीप कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सुनील बर्वे, देवदत्त नागे, संस्कृती बालगुडे, विजय पाटकर, जब्बर पटेल आणि शर्मन जोशी यांच्यासह बरेच स्टार्स उपस्थिती होते.
या स्क्रिनिंगवेळी सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसली. तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तसेच अभिनेत्री अलका कुबल ब-याच दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसल्या.
या सिनेमाची कथा ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर आणि केदार शिंदे यांची आहे. सिनेमाचा पुर्वार्ध दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरुन घेण्यात आला असून उत्तरार्ध केदार शिंदे यांनी रंगविला आहे. सोनाली कुलकर्णी, धरम गोहिल, मिलिंद फाटक, माधव देवचक्के, सुरभी हांडे, नम्या सक्सेना, उमा सरदेशमुख, विद्या पटवर्धन, वरुण उपाध्ये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. शिवाय भरत जाधव, प्रसाद ओक आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विशेष भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'अंग बाई अरेच्चा 2'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या कलाकारांचा खास अंदाज...
सर्व फोटो- अजित रेडेकर