आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बघतोस काय मुजरा कर\'च्या स्क्रिनिंगला अवतरले मराठी स्टार्स, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘बघतोस काय मुजरा कर’ हा सिनेमा आज (3 फेब्रुवारी) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे.  मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी गुरुवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते. आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, सायली संजीव, सचिन खेडेकर, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग यांच्यासह मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी या स्क्रिनिंगला बघायला मिळाली. या सिनेमात स्वतः हेमंत ढोमे एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले, अनंत जोग हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 

काय आहे सिनेमाची वनलाईन... 
मराठी माणसाचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं नित्सिम प्रेम सर्वश्रुत आहे. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महाराजांपेक्षा आनंदी दुसरे कोणीच नसते. हेमंतच्या या सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे.  तसेच सध्या महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे असा मेसेज या सिनेमातून देण्यात येणार आहे. तीन शीव भक्त एका बाजूला आहेत तर राजकारणी मंडळी एका बाजूला यांच्यातला लढा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतने ढोमेचे आहे. सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'बघतोस काय मुजरा कर'च्या स्क्रिनिंगला क्लिक झालेली मराठी स्टार्सची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...