आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी मराठीच्या कलाकारांसाठी \'किल्ला\'चे स्पेशल स्क्रिनिंग, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोेटो - डावीकडून - अभिनेता सुव्रत जोशी, सखी गोखले, पुष्कर चिरपुटकर, सुरभी हांडे आणि देवदत्त नागे )

मुंबईः मधुकर मुसळे, अजय राय, अलेन म्कॅलेक्स निर्मित आणि एस्सल व्हिजन प्रस्तुत राष्ट्रीय पारितोषिक विजेता मराठी चित्रपट 'किल्ला' येत्या 26 जून रोजी प्रदर्शित होतोय. झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसाठी अलीकडेच 'किल्ला'चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
'का रे दुरावा' फेम सुरुची अडारकर आणि सुयश टिळक, 'जय मल्हार' मालिकेतील देवदत्त नागे आणि सुरभी हांडे, 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी, अभिनेत्री सुहिता थत्ते आणि पुर्णिमा तळवलकर, 'जुळून येती रेशीमगाठी' फेम सुकन्या मोने, 'दिल दोस्ती दुनियादारी'ची टीम स्क्रिनिंगला उपस्थित होती. याशिवाय अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही किल्ला बघायला आवर्जुन हजेरी लावली होती.

दिग्दर्शनात पदार्पण करणारे दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध चित्रपट महोत्सवातही या सिनेमाला खूप पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय यावर्षीच्या झी गौरव पुरस्कारातही 'किल्ला' सिनेमाला 7 विभागात पुरस्कार मिळाले. प्रतिष्ठित अशा बर्लिन चित्रपट महोत्सवातही सिनेमाला मानाचा समजला जाणारा क्रिस्टल बियर आणि स्पेशल ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'किल्ला’ या चित्रपटातील चिनूची मध्यवर्ती भूमिका केलीये अर्चित देवधरने तर आईच्या भूमिकेत आहे अमृता सुभाष. याशिवाय त्याच्या मित्राच्या भूमिकेत पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे बालकलाकार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, किल्लाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या कलाकारांची खास छायाचित्रे...