आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साटंलोटं-पण सगळं खोटं’च्या स्पेशल स्क्रिनिंगला मराठी तारे-तारकांची मांदियाळी, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[छायाचित्रे - (डावीकडे वर) - दिग्दर्शिका श्रावणी देवध, पुष्कर श्रोत्री आणि सुचित्रा बांदेकर, (खाली) - शुभा खोटे आणि त्यांच्या कन्या भावना, (उजवीकडे वर) - पत्नी आणि मुलासोबत आदेश बांदेर, (खाली)- मकरंद अनासपुरे]

मुंबईः दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांची कमबॅक फिल्म ‘साटंलोटं-पण सगळं खोटं’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी रात्री मुंबईत आयोजित करण्यात आले होते. ज्यासाठी चित्रपटाच्या कलावंतासह अनेक सेलिब्रिटीजनीही उपस्थिती लावली.
दिग्दर्शिका श्रावणी देवधर, निर्माती सई देवधर आनंद आणि शक्ती आनंदसह मकरंद अनासपुरे, पुजा सावंत, आदिनाथ कोठारे, पुष्कर श्रोत्री हे चित्रपटाचे कलावंत यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे अमितराज, आदेश आणि सुचित्रा बांदेकर, प्राची शाह, शुभा खोटे, भावना बलसावर, महेश कोठारे, उर्मिला कानिटकर, सचिन पिळगांवकर, मानिनी डे, मिहीर मिश्रा, सुनील बर्वे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरही हजर होते.
नीतीन तेज अहूजा आणि अशोक भूषण यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन केलंय, शिरीष लाटकर यांनी. ‘साटंलोटं- पण सगळं खोटं’ हा युथफुल कॉमेडी चित्रपट 5 जूनला रिलीज होतं आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला जमलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...