आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थुकरटवाडीच्या कलाकरांनी झी गौरवमध्ये केले \'कट्यार काळजात घुसली\'चे Spoof

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘झी गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘चला हवा येऊ दे’च्या थुकरटवाडीतल्या कलाकरांनी कमाल केली. ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमाचं त्यांनी स्पुफ केलं. आणि जमलेल्या सेलिब्रिटींची हसून हसून पूरेवाट लागली.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या ह्या स्पुफला ह्या कलाकारांनी नांव दिलं होतं, ‘कट्यार कलेजीत घुसली’. निलेश साबळे ह्या एक्टमध्ये सचिन पिळगांवकर म्हणजेच खाँसाहेब बनला होता. तर भाऊ कदम शंकर महादेवन म्हणजेच पंडितजी बनला होता. कुशल बद्रिके सुबोध भावेच्या सदाशिव ह्या भूमिकेत होता. तर श्रेया बुगडेने मृण्मयी देशपांडेची उमा ही भूमिका केली होती. भारत गणेशपूरे राजा झाला होता. तर सगळ्यात अफलातून कविराज ही भूमिका केली होती सागर कारंडेने. सागरने कविराज ही भूमिका साकारताना अगदी रामदास आठवलेंसारखा हूबेहूब अंदाज आणि टोन वापरून एक्टमध्ये ख-य अर्थाने जान भरली होती.
कट्यारवर स्पुफ सादर होत असतानाच समोर बसलेल्या सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर ह्या सगळ्याच सेलेब्रिटींची हसून हसून पूर्ती मुरकुंडी उडाली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, थुकरटवाडीच्य ह्या एक्टचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...