आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spoof On Ka Re Durava, Sagar Mimics Aditi Whereas Bhau Mimics Jay

‘चला हवा येऊ द्या’मध्ये झाले ‘का रे दुरावा’चे Spoof, सागर बनला आदिती, भाऊ बनला जय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चला हवा येऊ द्या' मध्ये आले 'का रे दुरावा'चे कलाकार
नुकत्याच झालेल्या झी अवॉर्ड्समध्ये ‘का रे दुरावा’ मालिकेला ९ पुरस्कार मिळाले. त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार मिळवलेल्या झी मराठीच्या ह्या मालिकेतल्या कलाकारांना चला हवा येऊ द्यामध्ये एका विशेष भागासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.
‘पार्टी तो बनती है’ ह्या गाण्यावर दाभोळकर, आदिती, जय, रजनी, केतकर काकू, नवरे, आणि अख्खी टीम नाचली. त्यानंतर जय-आदितीमधला रोमँस पाहता आला. दोघंही ‘मला वेड लागले’ ह्या गाण्यावर शॅडो डान्स करू लागले. पण ‘चला हवा येऊ द्या’ची मजा तर पुढेच होती.
‘का रे दुरावा’वर भाऊ, सागर, कुशल, श्रेया, विनीत, भारत ह्या विनोदवीरांनी एक स्पुफ सादर केले. ह्या स्किटचे नाव होते, ‘का रे दुरावा प्रेमाचा गोलमाल’. अमोल पालेकर-उत्पल दत्त स्टारर ‘गोलमाल’ ह्या चित्रपटाचे आणि ‘का रे दुरावा’ ह्या मालिकेचे मिश्रण करून हे स्किट सादर करण्यात आले.
सागर कारंडे ह्यात ‘आदिती’, तर भाऊ कदम ‘जय’, कुशल बद्रिके ‘रजनी’, भारत गणेशपुरे ‘सुबोध भावे’ आणि ‘उत्पल दत्त’ मिश्रीत बॉस, श्रेया बुगडे ‘आऊ’, तर विनीत भोंडे ‘दाभोळकर’ आणि ‘नवरे’ अशा दोन्ही व्यक्तिरेखेत दिसत होते.
ह्या सगळ्यांनी मिळून ‘का रे दुरावा’च्या कलाकारांना एवढं हसवलं की, ते फक्त हसता हसता गडाबडा लोळायचेच काय ते बाकी होते.
त्यानंतर का रे दुरावाच्या कलाकारांवर खटला चालवण्यात आला. त्यातही विनोदवीरांनी खूप धमाल केली.
स्पुफ झाल्यावर भाऊ कदम म्हणाला, “ एक दिवस अगोदर आम्ही हा एक्ट तयार केला. त्यासाठी एक दिवस अगोदरपासून रिहर्सल केली. आम्ही एक नवीनच जय, आदिती, रजनी ह्या ‘का रे दुरावा’च्या कलाकरांना दाखवलीय. आणि त्यांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात आलं, की, त्यांनी तो एक्ट खूप एन्जॉय केला.”
झी अवॉर्ड्समध्ये सागर कारंडे जय बनला होता. तर चला हवा येऊ द्यामध्ये तो आदिती बनलाय. सागर म्हणतो, “ जशी जयच्या व्यक्तिमत्वामधली एक वेगळीच बाजू मी जय बनून दाखवली. तशीच आदितीमधल्या बारीक-सारीक लकबी मी उचलल्या. आणि आदितीने ही शो खूप एन्जॉय केला.”
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय होती, जय, आदिती आणि रजनीची प्रतिक्रिया