आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'लॉस्ट अँड फाऊंड\'मध्ये स्पृहा-सिद्धार्थची फ्रेश जोडी, पोस्टर लाँचला ग्लॅमरस लूकमध्ये दिसली स्पृहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या आगामी मराठी सिनेमातून स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी स्पृहाचा ग्लॅमरस लूक लक्ष वेधणारा ठरला. तर सिद्धार्थही कूल लूकमध्ये दिसला.

काय आहे सिनेमाची स्टोरीलाईन...
खरं तर सिनेमाच्या इंग्रजी नावावरूनच, या सिनेमाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होते आहे. दिवसेंदिवस शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दी देखील वाढत आहे आणि या माणसांच्या गर्दीतली माणसं मात्र गर्दीत एकाकी आहेत. हा विरोधाभास जरी वाटत असला, तरी हेच सत्य आहे. जागतिक पातळीवर, 'depression rate' , भारतात सर्वाधिक असून अगदी फेसबुक, व्हॉट्स अपच्या, 'व्हर्चुअल गर्दीत' सुद्धा माणूस एकटा पडलाय, एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवं असतं, त्याचं हे 'एकटेपण', ऐकून घेणारा आणि 'हो मी समजू शकतो' म्हणणारा कोणी एक. सिनेमातील, सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या एकाकीपणातूनच त्यांची प्रेमकथा सुरू होते का? त्यांनी आपापल्या आयुष्यात काहीतरी गमावलाय का? जे गमावलंय ते त्यांना गवसतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 29 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या 'लॉस्ट अँड फाऊंड ' या आगामी सिनेमात मिळणार आहेत.

सिध्दार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई आणि डॉ मोहन आगाशे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि डॉ राहुल देशपांडे यांनी या सिनेमाची श्रवणीय गाणी लिहिली असून शुभांकर यांनी लयबद्ध संगीत दिलं आहे. विनोद मालगेवार यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे ऋतुराज धालगडे यांनी.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा सिनेमाचा ट्रेलर आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये पोस्टर लाँच सोहळ्यात क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...