आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पृहाने लिहीलं अंकुश-मुक्ताच्या लव्हस्टोरीसाठी गाणं, म्हणतेय ‘किती सांगायचंय मला’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी
एका अभिनेत्रीची सिल्व्हर स्क्रिनवरची लव्हस्टोरी फुलवायला दुस-या अभिनेत्रीने गाणे लिहीणे, क्वचितच एखाद्या फिल्म इंडस्ट्रीत होत असावे. पण मराठीत तरी झालंय. अंकुश आणि मुक्ता यांची आगामी डबल सीट चित्रपटातली लव्ह स्टोरी फुलवायला अभिनेत्री आणि कवियत्री स्पृहा जोशीने एक सुंदरसे रोमँटिक गाणे लिहीले आहे. ह्या गाण्याचे बोल आहेत ,’किती सांगायचेय मला’
ह्या गाण्याविषीय स्पृहा जोशी सांगते, “ असं क्वचितच होतं, की एखाद्या गीतकाराला दिग्दर्शक त्याला हवं असलेलं रोमॅंटिक गाणं कसं अभिप्रेत आहे. हे सांगताना, चित्रपटाची पूर्ण कथा ऐकवतो. समीर विध्वंसने मला पूर्ण कथा ऐकवली. किती सांगायचंय मला, हे गाणं लिहल्यावर मग तर हृषिकेश, सौरभ, जसराज ह्यांच्यासोबत खूप चर्चा झाली. आणि एक सुंदर हळुवार गाणं आकाराला आलं. ह्या चित्रपटात असलेलं साधेपण मी ह्या गाण्यांतल्या शब्दांमध्ये यावं, याचा प्रयत्न केलाय.”
ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या समीर विध्वंस आणि लेखन केलेल्या क्षितीज पटवर्धनने सुध्दा चित्रपटात प्रत्येकी दोन-दोन गाणी लिहीली आहेत. त्याविषयी ते दोघेही सांगतात, “चित्रपट लिहीताना आणि दिग्दर्शित करताना एवढा आपला झाला होता, की, त्यातलं काव्य आपोआप कागदावर उमटतं गेलं. ही कथा स्वप्नांची आहे. मायानगरीत राहणारा प्रत्येक माणूस आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना जे फिल करतो. तो फिल ह्यातल्या गाण्यांमध्ये आहे. स्पृहाने लिहीलेलं गाणंही अप्रतिम झालंय. आणि म्हणूनच तर डबलसीटचा फस्ट लूक ट्रेलर लाँच करताना मुक्ताचं गाणं त्यात ठेवलं होतं. आणि आता तर हे पूर्ण गाणं म्युझिक लाँच झाल्याने ऐकता येणार आहे. “
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डबल सीट चित्रपटाच्या म्युझिक लाँचचे फोटो आणि स्पृहाच्या गाण्याचा टिझर