आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz Is: रोहित शेट्टी-शाहरुखच्या पहिल्या मराठी सिनेमात स्वप्नील जोशीची वर्णी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रोहित शेट्टी आणि शाहरुख खान, इनसेटमध्ये स्वप्नील जोशी)

मराठीत दर्जेदार सिनेमे आणि त्यांच्या प्रचंड व्यवसायामुळे बॉलिवूडकर आता मराठीच्या प्रेमात पडत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला हळूहळू येतोय. अभिनेता रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांनी आपला मोर्चा मराठीकडे वळवला. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी मराठीत तब्बल सहा सिनेमांची निर्मिती करणार आहेत.
विशेष म्हणजे शाहरुख आणि रोहित यांनी आपल्या पहिल्या मराठी सिनेमासाठी काम सुरु केले आहे. या दोघांनी पहिल्या मराठी प्रोजेक्टसाठी मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीला साइन केले आहे. अद्याप या सिनेमाविषयीची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र हा सिनेमा 'दुनियादारी'चे दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. इतकेच नाही तर संजय लीला भन्साळी यांनीदेखील आपल्या मराठी प्रोजेक्टसाठी स्वप्नील जोशीला साइन केले आहे.
मराठी इंडस्ट्रीत स्वप्नील जोशी सध्या फॉर्मात आहे. अलीकडेच रिलीज झालेला त्याचा 'मितवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याशिवाय लवकरच त्याचा 'मुंबई-पुणे-मुंबई 2' हा सिनेमासुद्धा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या सिनेमात स्वप्नीलसोबत मुक्ता बर्वे झळकणार असून हा 'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमाशिवाय अमृता खानविलकरसोबतचा त्याचा 'वेलकम जिंदगी' हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत स्वप्नील जोशीने यावर्षाच्या शेवटी एक मोठे सरप्राइज आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे म्हटले होते. आता हे सरप्राइज म्हणजे शाहरुख-रोहित शेट्टी सिनेमात त्याची लागलेली वर्णी हेच आहे का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्वप्नील जोशीची खास छायाचित्रे...