आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जिंकत नाही मी शिकत गेलो...', सचिनने उलगडला 'हाच माझा मार्ग'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सचिन पिळगावकर)
नाशिकः आज माझ्या सिने कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली. अनेक जण म्हणतात सचिन तू जिंकलास... पण मी जिंकत गेलो यापेक्षा मी जिंकलो नाही तर शिकत गेलो. आपल्या सानिध्यात येणाऱ्या माणसांमधील गुणांना स्विकारत त्यातून आपल्याला काय मिळेल हा विचार करत मी पुढे गेलो आणि हा माझा मार्ग अर्ध्यापर्यंत आला आहे असा नम्र संवाद अभिनेता सचिन पिळगावकर यांनी नाशिककरांशी साधला. लेखक तुमच्या भेटीला उपक्रमांतर्गत सचिन यांची खास मुलाखत डॉ. कुर्तकोटी सभागृहात रंगकर्मी सदानंद जोशी यांनी रविवारी घेतली. पाऊल ठेवायला जागा नाही अशा गर्दीत सचिन यांनी रसिकांना स्वतच्या आयुष्यासह चित्रपट सृष्टीतील स्मृतींच्या तळाशी नेले.

एवढ्या तरुण वयात आत्मकथन का लिहावेसे वाटले...
- आत्मकथन कर असे मला खरंतर कोणी सांगितले नाही मी स्वतःच स्वतःला सूचना केली. आता माझ्या सिने कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली. अजून आपल्याला 50 वर्षे काम करायचे आहे. (टाळ्या) त्यानंतर जर मी आत्मचरीत्र लिहायला घेतलं तर ते पुस्तक किती मोठं होईल आणि त्याची किंमतही वाढेल. मुळातच एवढ्या जाड पुस्तके, प्रकाशक मिळेल का? असा विचार केला आणि हा पहिला भाग लिहिला. तुम्हाला पुस्तकाच्या शेवटी 'मध्यंतर' असा शब्दही दिसेल.
सचिन यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...