आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Pravah New Serial Tumacha Amacha Same Asata

Xclusive Photoshoot: नवी मालिका ‘तुमचं आमचं सेम असतं’, नवी लव्हस्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तुमचं आमचं सेम असतं'चे फोटोशूट
प्रेमात पडल्यावरची हूरहूर जरी त्या प्रेमी युगलासाठी नवीन असली तरीही प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने ती भावना, ओढ, हूरहूर, आणि ते रूपेरी क्षण अनुभवलेले असतातच. म्हणूनच तर मंगेश पाडगांवकरांनी कवितेतून सांगितलंय, की ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असतं’. आणि आता प्रेमातले ते फुलपाखरासारखे क्षण ३१ ऑगस्ट पासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणारी ‘तुमचं आमचं सेम असतं’ ही नवी मालिका जिवंत करणार आहे.
ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या स्तवन शिंदे आणि अमृता देशमुखचे नुकतेच फोटोशुट झाले. सलमान खानसाठी नेहमी फोटोग्राफी करणा-या फोटोग्राफर मुन्नाने हे फोटोशूट केले. तर ह्या फोटोशूटचे दिग्दर्शन केल आहे, सचिन बावकर ह्यांनी.
फोटोशूटवेळी फोटोग्राफर मुन्नाच्या कॅमे-यासोबतच divyamarathi.comच्याही कॅमे-यासाठी स्तवन आणि अमृता झकास पोझ देत होते. त्यांच्या बॉडीलँग्वेज मधून त्यांची बाँडिंगही दिसत होती. त्याविषयी विचारल्यावर अमृता म्हणाली, “ मी आणि स्तवन दोघेही पूण्याचे आहोत. आम्ही गेली ३-४ वर्ष एकमेकांना ओळखतोय. आम्ही एका कार्यक्रमात भेटलो होतो. तिथे आमची ओळख आणि नंतर मैत्री झाली. त्यानंतर जेव्हा ह्या मालिकेसाठी मी सिलेक्ट झाले आणि माझ्यासोबत एका नव्या चेह-याची गरज होती, तेव्हा मी स्तवनचे नाव सजेस्ट केले आणि त्याचे सिलेक्शन झाले. आणि आता तर गेले एक महिना आम्ही शुटिंग करतोय. त्यामुळे मैत्री अजूनच घट्ट झालीय. त्यामूळेच तर आमची केमिस्ट्री तुम्हांला दिसून येतेय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मालिकेत काय पाहायला मिळणार ?