आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका एपिसोडसाठी एवढी फीस घेतो भारत, वाचा किती कमावतात \'चला हवा येऊ द्या\'चे कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थुकरटवाडीचे सरपंच अर्थातच अभिनेते भारत गणेशपुरे यांना एका एपिसोडसाठी 75 हजार रुपये मानधन म्हणून मिळतात. - Divya Marathi
थुकरटवाडीचे सरपंच अर्थातच अभिनेते भारत गणेशपुरे यांना एका एपिसोडसाठी 75 हजार रुपये मानधन म्हणून मिळतात.
'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', 'सैराट'पर्यंत आणि हिंदीतील 'नगिना', 'तिरंगा', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' पासून आजच्या 'इंग्लिश-विंग्लिश', 'दंगल' आणि 'बाहुबली 2'पर्यंत अनेक सिनेमांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे.
डॉ. निलेश साबळे या शोचा कॅप्टन आहे. तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम ही त्याची तगडी विनोदवीरांची फौज आहे. आतापर्यंत या शोने दोनशेहून अधिक एपिसोड्सचा पल्ला गाठला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मानधनाच्या रुपात या कलाकारांना किती रुपये मिळतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? भारत गणेशपुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (15 ऑगस्ट) हीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, प्रत्येक एपिसोडसाठी चला हवा येऊ द्याचे कलाकार किती मानधन घेतात..
नोटः एका युट्यूब चॅनलने या कलाकारांच्या मानधनाचा व्हिडिओ नुकताच युट्युबवर शेअर केला असून त्याआधारावर हे आकडे येथे घेण्यात आले आहेत.

 
बातम्या आणखी आहेत...