आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी जाधव यांच्या नटरंग मुळे \'दुसरी सोनाली कोण?\' हे विचारणाऱ्यांना मिळाले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपट सृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच नटरंग फेम सोनाली कुलकर्णी ही सध्याच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. तसे पाहता 2006 मध्ये आलेल्या गौरी चित्रपटापासून सोनालीचे करिअर सुरु झाले. त्याचवर्षी आलेल्या गाढवाचं लग्नमुळंही ती काहीशी चर्चेतही आली. त्यानंतरही तिचे काही चांगले चित्रपट आले. पण सोनालीला घराघरात पोहोचवलं ते रवी जाधव यांच्या नटरंग चित्रपटाने. या चित्रपटामुळे सोनाली कुलकर्णी खऱ्या अर्थाने मराठी सिने इंडस्ट्रीची अप्सरा बनली. 
 
पुरस्कार स्वीकारताना झाले ऑडिशन..
- सोनाली कुलकर्णीचा जन्म पुण्यातील खडकी येथे झाला आहे.
- सोनाली कुलकर्णीचा खऱ्या अर्थाने पहिला चित्रपट होता बकुळा नामदेव घोटाळे. या चित्रपटामुळेच तिला नटरंग सिनेमाची ऑफर मिळाली होती. 
- नटरंग सिनेमातील भूमिकेमुळे सोनाली कुलकर्णीला घराघरात ओळख मिळाली. 
- नटरंग पूर्वी लोक ही दुसरी सोनाली कोण? असे विचारायचे. पण नटरंगनंतर तिला दुसरी सोनाली म्हणजे 'अप्सरा' अशी ओळख मिळाली. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा कशी झाली नटरंगसाठी सोनालीची निवड..
 
 
बातम्या आणखी आहेत...