चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून
आपल्या सर्वांच्या भेटीला येणारे पोस्टमन काका हे आता अवघ्या महाराष्ट्राच्या चांगल्याच ओळखीचे झाले आहेत. आपल्या पत्रांच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या सामाजिक विषयांना हात घालत त्यावर चपखल भाष्य करण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अशाच एका एपिसोडमध्ये पुन्हा एकदा या पोस्टमन काकांनी सर्वांना सुन्न केले. पावसावर भाष्य करणाऱ्या या पत्रामध्ये आपण कसे स्वार्थीपणाने पावसाची वाट पाहतो, प्रत्यक्ष पावसावर जीवन असलेल्या शेतकऱ्याची आपल्याला काही काळजी नसते, याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद जगताप यांचे शब्द हे आपल्या अंतर्मनाला भिडल्याशिवाय राहत नाहीत. चला तर मग पाहुयात काय लिहलंय या पत्रात...