आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : उत्तम डान्सरही आहेत महेश मांजरेकर, कधी पाहिलाय त्यांचा डान्स.. पाहा हा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महेश मांजरेकर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभी राहते एका अत्यंत गुणी कलाकाराची प्रतिमा. महेश मांजरेकर यांचे चित्रपट किंवा त्यांनी केलेल्या भूमिका पाहता ते कधी डान्स करण्याच्या भानगडीत फारसे पडले नसतील असेच, आपल्या सगळ्यांना वाटते. पण ते खरे नाही. महेश मांजरेकरांनी डान्स रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता आणि अंतिम तीनपर्यंत ते पोहोचलेही होती. म्हणजे त्यांनी चांगला डान्स केला होता, हे यावरून स्पष्ट होते. 

झलक दिखला जा..
हिंदीतील सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये आघाडीवर असलेल्या झलक दिखला जा या शोमध्ये महेश मांजरेकर सहभागी झाले होते. 2006 साली झलक दिखला जा या शोचा पहिला सिझन सोनी टीव्हीवर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये महेश मांजरेकर स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. महेश यांची कोरिओग्राफर होती सोनिया जाफर. झलक दिखला जा चा या सिझनमध्ये फराह खान, संजय लीला भन्साळी आणि शिल्पा शेट्टी हे जज होते. 

मुन्नाभाईच्या गाण्यावर पहिला डान्स..
महेश मांजरेकर यांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील देख ले या गाण्यावर चक्क सालसा डान्स करत दमदार एंट्री केली होती. त्यांचा हा डान्स पाहून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. त्यानंतर महेश मांजरेकर एकापेक्षा एक खास परफॉर्मन्स करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, महेश मांजरेकर यांचे डान्सच्या रुपातील काही PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा महेश मांजरेकर यांच्या डान्सचा Video.. 
बातम्या आणखी आहेत...