आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या नाटकांमध्ये बिझी आहे आपली अॅना, सोशल मीडियावर अशी असते Active

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून प्रसिद्धीस आलेली पुजा ठोंबरे. - Divya Marathi
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून प्रसिद्धीस आलेली पुजा ठोंबरे.
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहोचलेले कलाकार हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. पण ही मालिका बंद झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांत ही टीम चाहत्यांना एकत्र पाहायला मिळाली नव्हती. पण पण नुकतीच फेसबूकद्वारे एका आगळ्या वेगळ्या प्रमोशनमधून एका नाटकाची घोषणा करण्यात आली. या नाटकात दिल दोस्तीमधील चार चेहरे पुन्हा एकदा चाहत्यांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. मालिकेतील कैवल्य, सुजय, रेश्मा आणि अॅना या चौघांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.
दिल दोस्तीनंतर हे सर्व जण आपल्या विविध कामांत व्यस्त आहेत. त्यातील चाहत्यांच्या आवडीची आपली अॅना म्हणजेच पुजा ठोंबरेही सध्या नाटकांमध्ये व्यस्त आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकात ती जुन्या सहकाऱ्यांबरोबर दिसणार आहे. तसेच त्याआधी द पॅनिक डे नावाच्या नाटकातही अॅना दिसली होती. अॅनाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून तिच्याबाबत चाहत्यांना माहिती मिळत असते. नाटकांचे प्रमोशनही ती यावरून करते. तसेच तिचे काही खास फोटोही चाहत्यांसाठी ती वेळोवेळी इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते. पाहुयात सोशल मीडियावरील आपल्या अॅनाचे काही खास लूक.

पुढील स्लाइडवर पाहा, अॅनाने सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही फोटोंमधील झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...