आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरोज खानच्या शोमध्ये होती ग्रुप डान्सर, आता आहे मराठी इंडस्ट्रीची Top Actress

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. बडोद्यात जन्मलेल्या प्रार्थनाचा नुकताच वाढदिवस झाला. टिव्हीवरील अगदी छोट्याशा भूमिकेतून सुरू झालेला प्रार्थनाचा प्रवास हा अतिशय रंजक असा राहिलेला आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाने घराघरात पोहोचलेल्या पवित्र रिश्तामधून सुरुवात केल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण त्याही आधी कोरिओग्राफर सरोज खान यांच्या डान्स शिकवण्याच्या शोमध्ये प्रार्थना डान्सर होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. 

प्रार्थनाचा प्रवास... 
- झी टिव्हीवरील गाजलेल्या पवित्र रिश्ता मालिकेतून सर्वात आधी प्रार्थना घराघरात पोहोचली. 
- मालिकेतील प्रमुख पात्र अर्चना म्हणजे अंकिता लोखंडेच्या लहान बहिणीची म्हणजे वैशाली ही भूमिका प्रार्थनाने केली होती. 
- ही मालिका मिळण्याआधी ती एका डान्स टिचिंग शोमध्ये डान्सर म्हणून काम करत होती. 
- कोरियोग्राफर सरोज खान या शोमध्ये प्रमुख गाण्यांवर डान्सचे धडे द्यायच्या. 
- स्टार वन वरील गाजलेल्या रिमिक्स मालिकेतही प्रार्थनाने छोटीशी भूमिका केली होती. 
- या भूमिकेमुळे प्रार्थनाला लव्ह यू मिस्टर कलाकार या चित्रपटात संधी मिळाली होती. 
- .. मि. कलाकार चित्रपटात प्रार्थनाने अमृता राव आणि तुषार कपूर यांच्याबरोबर काम केले होते. 
- त्याचबरोबर सलमान खानच्या गाजलेल्या बॉडीगार्ड सिनेमातही तिची छोटीशी भूमिका होती. 
- बॉडीगार्डमुळे प्रार्थनाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. 
- दरम्यान प्रार्थनाना मराठी मालिकांमध्ये कामाच्या ऑफर येत होते. 
- माय लेक या मालिकेमध्ये प्रार्थनाने महत्त्वाची भूमिका केली होती.  
- 2013 मध्ये तिने वक्रतुंड महाकाय हा मराठी चित्रपट केला. त्यात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.
- पण तिचा मोठा ब्रेक ठरला तो अवधूत गुप्ते यांचा चित्रपट जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा. 
- त्यानंतर मराठी चित्रपटांत प्रार्थनाचा डंका वाजू लागला. 
- मितवा तसेच कॉफी आणि बरंच काही या चित्रपटांनी ती आघाडीची नायिका असल्याचे शिक्कामोर्तब झाले. 
- नुकताच तिचा मिस्टर अँड मिसेस सदाचारी आणि वजह तुम हो हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला आला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रार्थनाचे काही खास PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...