आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच्या सुरांवरच नव्हे सौंदर्यावरही फिदा आहेत चाहते, पाहा कोण आहे मराठमोळी Glamgirl

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केतकी माटेगावकर हे नाव ऐकलं की आपोआपच आपल्या कानात सुरेल स्वर ऐकू यायला लागतात. पण एवढेच नाही, तर तिचा सुंदर चेहराही डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षात केतकीने गायनाबरोबरच तिच्या अभिनयनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. 

दोन दिवसांपूर्वी जळगावात एका कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या प्रकारामुळे केतकी माटेगावर चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात गेस्ट म्हणून गेलेल्या केतकीला चोख बंदोबस्त नसल्याने चांगल्याच त्रासाला सामोरे जावे लागले. तशी तक्रारही तिच्या वडिलांनी केली. पण नंतर या वादावर पडदा पडला. 

खरं तर केतकी महाराष्ट्राच्या रसिकांसमोर आली होती, ती एका चिमुरड्या गायिकेच्या रुपात. पण शाळा चित्रपटाच्या माध्यमातून तिच्या अभिनयाचे दर्शन चाहत्यांना घडले आणि प्रेक्षकांना तिला अभिनेत्री म्हणून पाहायला अधिक आवडू लागले. पुढे शाळानंतर काकस्पर्श, टाइमपास, फुंतरू अशा चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दिसली. पण त्याचबरोबर तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली. तिचे असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून दाखवणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, केतकीचे काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...