आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठारेंच्या घरी येणार नवा पाहुणा, अशी फुलली होती उर्मिला-आदिनाथची लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील काही क्युट कपलपैकी एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर-कोठारे हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. सिनेमाच्या निमित्ताने झालेल्या दोघांच्या भेटीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि ते आयुष्यभराचे साथीदार बनले. पण त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच मजेशीर आहे. या गूड न्यूजच्या निमित्ताने जाणून घेऊयात कसे फुलले होते, उर्मिला आणि आदिनाथ यांचे प्रेम.  

उर्मिला आणि आदिनाथ यांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या तयारीत होते. याचित्रपटासाठी ते हिरोइनच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली होती. पण त्यावेळी उर्मिला कोठारेंच्या घरी आली आणि असे काही घडले की, पुढे आयुष्यभरासाठी तेच उर्मिलाचे घर बनले. हे सर्व एका चित्रपटाच्या निमित्ताने घडले असले तरी त्याची संपूर्ण स्टोरी ही अत्यंत रंजक अशी आहे.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी.. नेमके कसे जुळले त्यांचे प्रेम..
 
बातम्या आणखी आहेत...