आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत लहानाची मोठी झाली ही सौंदर्यवती, 'मिस दिवा' स्पर्धेत मिळवले आहे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मिस दिवा युनिव्हर्स 2015 स्पर्धेत सेकंड रनरअप राहिलेली औरंगाबादची कन्या नवेली देशमुख हिचा आज (5 May)वाढदिवस आहे. जागतिक स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मिळवलेले यश आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले असल्याचे नवेली सांगते. विशेष म्हणजे नवेलीचे औरंगाबाशी जवळचे नाते आहे. औरंगाबादेतच ती लहानाची मोठी झाली असून, तिचे शालेय शिक्षणही शहरातच झालेले आहे. 

मिस दिवा स्पर्धेत यश मिळवल्यानंतर नवेली औरंगाबादला आली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना तिच्या यशाचे गमक जाणून घेतले होते. त्यावेळी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आईचे सहकार्य या जोरावरच हे यश मिळवता आले असे तिने सांगितले होते. ब्युटी कॉन्टेस्ट्समध्ये यश मिळवण्यासाठी केवळ गोरा रंग किंवा सौंदर्याची गरज असते हा गैरसमज असल्याचे नवेलीचे मत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावरील नवेली देशमुखचे काही PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...