आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : राणाजींच्या पाठकबाईंचे हे फोटोज पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, \'तुझ्यात जीव गुंतला\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - छोटा पडदा हा सध्याच्या घडीला प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनला आहे. त्यातही मराठी मालिकांचा विचार करता अनेक मालिका या घरातील लहान थोरांच्या आवडीच्या बनल्या आहेत. अशाच सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव गुंतला. या मालिकेतील राणा आणि अंजली बाईंच्या तर प्रत्येक जण जणू प्रेमात पडलेला दिसतो. याच अंजली बाईंचा म्हणजे अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे. 
 
शेतामध्ये राबणारा पिळदार शरीर असलेला पहिलवान राणा आणि तेवढीच नाजूक अंजली या दोघांची जोडी आणि त्यांच्यातील मजा अशी वेगळीच केमिस्ट्री या मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यातही अंजली लोकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. मालिकेमध्ये अत्यंत शांत, संयमी आणि सोज्वळ असलेली अंजली म्हणजेच अक्षया देवधर ही प्रत्यक्षात चांगलीच मस्तीही करते. अक्षया आज वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने तिच्या अशा रुपाची झलक आज तिच्या चाहत्यांना दाखवणार आहोत, जी मालिकेमध्ये कदाचित कधीही पाहायला मिळणार नाही. सोशल मीडियावर अक्षयाचे अनेक जुने आणि सुंदर फोटो आहेत. हे फोटो आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाठकबाई म्हणजेच अक्षय्या देवधर हिचे काही खास PHOTOS..
 
 
बातम्या आणखी आहेत...