आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता, जितू, संतोषसह मराठी सेलिब्रिटी झाले झिंगाट, पाहा हा भन्नाट VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळीकडेच सैराट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 29 तारखेला रिलीज होत असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन अगदी वेगळ्या पद्धतीने केले जात आहे. अगदी पहिला टिझर लाँच केला तेव्हापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणून धरण्यात आली होती. त्यानंतर हळू हळू या चित्रपटातील गाणी समोर आली. त्या गाण्यांनी तर अवघ्या महाराष्ट्रालाच याड लावलं. त्यानंतर चित्रपट रिलीज होण्याच्या अगदी दोन आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यानंतर तर हा चित्रपट कधी रिलीज होणार याचीच वाट सगळे पाहत आहेत. नागराज मंजुळेंचे दिग्दर्शन, अजय अतुलचे म्युझिक यामुळे चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

या चित्रपटाचे प्रमोशन हे अगदीच वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता आणि आकर्षण निर्माण करण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणजे, खास प्रमोशनसाठी तयार केलेल मराठी सेलिब्रिटींचे झिंगाट हे प्रमोशनल साँग. झिंगाट या गाण्यावर मराठी सेलिब्रिटींनी केलेला झिंगाट डान्स पाहून सगळेच चाहते सैराट होत आहेत.
नागराज मंजुळे यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओने सोशल मिडियावर धूम केलेली आहे. अमृता खानविलकर, प्रिया बापट, उमेश कामत, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, हेमांगी कवी, आदिनाथ कोठारे यासह अनेक मराठी सेलिब्रिटी झिंगाट होऊन डान्स करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे कोणताही मेकअप नाही, ड्रेस नाही की सेट नाही अगदी घरात, कारमध्ये हे व्हिडीओ शूट करून मिक्स केलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने झिंगाट असा हा व्हिडीओ तयार झाला आहे. चला तर मग पाहुयात या झिंगाट व्हिडीओची एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, डान्स करणाऱ्या सेलिब्रिटींचे काही स्क्रीनशॉट्स आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO